मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

15 दिवसांपासून गायब असलेल्या संजय राठोड आले समोर, मंदिरातला पहिला VIDEO

15 दिवसांपासून गायब असलेल्या संजय राठोड आले समोर, मंदिरातला पहिला VIDEO

  • Published by:  sachin Salve

वाशिम, 23 फेब्रुवारी : पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि  राज्याचे वन, भूकंप  पुनर्वसन मंत्री संजय राठोड अखेर 15 दिवसांनंतर समोर आले आहे. संजय राठोड हे पोहरागड इथं दर्शनासाठी पोहोचले आहे. यावेळी त्यांच्या समर्थनासाठी हजारो कार्यकर्ते जमले आहे.

संजय राठोड हे यवतमाळ येथील आपल्या घरीच होते. आज सकाळी 9 वाजता पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. साधारण 80 किमी अंतरावर असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यांच्या सोबत कुटुंबीय व स्थानिक नेतेही आहेत. पोहोरादेवी येथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी राठोड यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. कोरोना संसर्गामुळे गर्दी होऊ देऊ नका, अशी सूचना पोलीस प्रशासनाकडून वारंवार केली जात होती. पण तरीही समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला.

काय आहे प्रकरण?

बीडमधील पूजा चव्हाण (Pooja Chavan) या 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर अख्खं राजकारण ढवळून निघालं आहे.  या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने  यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

First published:

Tags: BJP, PM narendra modi, Pooja Chavan, Sanjay rathod, Uddhav thackarey