मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावमध्ये शेतकऱ्याचा गेला जीव

महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावमध्ये शेतकऱ्याचा गेला जीव

शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा (summer ) फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer dead) झाला

शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा (summer ) फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer dead) झाला

शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा (summer ) फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer dead) झाला

  • Published by:  sachin Salve

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी

जळगाव, 30 मार्च : राज्यात उन्हाचा पारा (maharashtra temperature) दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक शहरात उष्णतेची लाट येणार असा इशारा देण्यात आला आहे. अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा (heatstroke) पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा (summer ) फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer dead) झाला आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ इथं ही घटना समोर आली आहे.  33 वर्षीय जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जितेंद्र माळी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले आणि त्यानंतर शेतात कामाला गेले होते. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

('या' कारणांमुळे उन्हाळ्यात आगीच्या घटनांत होते वाढ, या गोष्टींची घ्या काळजी)

या प्रकरणी  अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला असं स्थानिक डॉक्टरांचे म्हणणं आहे. तर  मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष पाटील यांनी माहिती दिली. दरम्यान, माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर योग्य तो खुलासा होईल.

दुसऱ्या दिवशीही जळगावच्या तापमानाचा पारा 44 अंशांवर

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा चांगलाच तापला असून आज सकाळपासूनच सुर्य आग ओकू लागला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी देखील तापमानाचा पार 44 अंशाच्यावर येऊन पोहोचला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्माघात वा अन्य विकारांवर तात्काळ उपाययोजनाची अंमलबजावणी करीत आरोग्य यंत्रणेस सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले.

(आलिया भट्ट ठरली सर्वात महागडी अभिनेत्री, व्हॅल्यू सेलिब्रेटी लिस्टमध्ये केलं टॉप)

जळगाव जिल्ह्यात २७ ते ३१ मार्च दरम्यान उष्णतेची लाट येणाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडून वाढत्या तापमानाच्या दुष्परिणामाची शक्यता लक्षात घेता, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुका ग्रामीण रुग्णालये तसंच उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यासह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे. तर आज तापमानाचा पारा 44 अंशांवर आहे.  वाढत्या तापमानामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आले आहे.

First published: