मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला ठाण्यात, महिलेचा डोळा झाला निकामी

म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला ठाण्यात, महिलेचा डोळा झाला निकामी

 उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले, तसंच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती

उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले, तसंच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती

उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले, तसंच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती

ठाणे, 11 मे : कोरोनाबाधित (Corona) रुग्णांमध्ये आता एका नवीन आजाराची लक्षणे दिसून येतात ज्याला म्युकोरमायकोसिस (mucormycosis) असे म्हटले गेले आह ही लक्षणे असलेला पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात (Thane) ठाण्यात आढळला आहे. एका महिलेमध्ये ही लक्षण आढळून आली असून तिचा डोळा निकामी झाला आहे.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात ही चिंता वाढवणारी घटना घडली असून एका 56 वर्षीय महिलेसोबत हे घडलंय. या महिलेला कोरोना झाला होता मात्र याच दरम्यान त्या महिलेची रोग प्रतिकार शक्ती कमालीची कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल समोर आला ज्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी महिलेची तपासणी केली असता, महिलेच्या डोळेवर आललेले दिसून आले तर उजव्या डोळ्याची हालचाल होत नसल्याचे तपासणी दरम्यान लक्षात आले, तसंच महिलेच्या उजव्या डोळ्यावर प्रकाश टाकल्यानंतरही डोळ्याची कोणतीच हालचाल होत नव्हती. तर महिलेच्या सिटीस्कॅन, ओर्बिट ब्रेन सिटी स्कॅन चाचणी अहवालात देखील अनेक लक्षणे आढळून आले.

भयंकर! गंगेत वाहताना आढळले 40-45 मृतदेह; कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय

उजव्या डोळ्याच्या मासपेशींना सूज आली होती तसंच इतरही अंतर्गत लक्षणे वैद्यकीय चाचणी अहवालात दिसून आले. या आधारे तसंच म्युकोरमायकोसिस या आजाराची सांगितली गेलेली लक्षणं या महिलेत आढळल्याने या महिलेला म्युकोरमायकोसिस असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्यात कोरोनाचे स्ट्रेन देखील बदलत आहेत. यानुसार, काही जिल्ह्यांमध्ये कोरोना या आजारात रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्याने त्यांच्यात म्युकोरमायकोसिस नावाचा आजार आढळून येत असल्याचे दिसून येत आहे.

मोठी बातमी..! मुंबई महापालिका 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार

यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत आहे. यात रुग्णांचे डोळे निकामी होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. म्युकोरमायकोसिस नावाचा बुरशीपासून होणारा दुर्मीळ, पण अत्यंत घातक संसर्ग आहे. त्यातून डोळा गमविल्याची प्रकरणे मात्र नवीनच आहेत. हा आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कोरोनाकाळात कमी झालेली रोग प्रतिकार शक्ती. तर या आजाराचे सायनसमधून संक्रमण सुरू होते पुढे ते तोंडाच्या आतून वरचा जबडा, डोळा आणि मेंदूपर्यंत पोहोचते.  ज्यामुळे पापणीला सूज येते, पापणी जड होते, डोळे पुढे येतात, डोळ्यांभोवतीची त्वचा काळपट होते, डोळ्यांची हालचाल मंदावते, धुरकट दिसू लागते , नाकावर सूज, नाक चोंदते, चेहऱ्यावर एका बाजूने सूज येते, डोळ्यांमध्ये वेदना होतात.

म्युकोरमायकोसिस हा काळ्या बुरशी सारखा असतो. तो केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीत देखील होवू शकतो, यामुळे डोळा कायमचा निकामी होतो. शिवाय पॅरालिसिस आणि मृत्यूही यात ओढावण्याची शक्यता आहे, असं तज्ञांचे म्हणणे आहे.

First published: