CoronaEffect : कल्याणमध्ये होणार राज्यातील पहिलीच ऑनलाइन निवडणूक

CoronaEffect : कल्याणमध्ये होणार राज्यातील पहिलीच ऑनलाइन निवडणूक

राज्यातील वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे

  • Share this:

कल्याण, 13 जुलै : केडीएमसीचे परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कालावधी मार्चमध्ये संपुष्टात आला आहे. मात्र राज्यभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावात नव्या सभापतीची निवड होऊ शकलेली नाही. ही रखडलेली निवडणूक आता ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार आहे.

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात हळूहळू सर्व सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामध्येही पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कल्याणमध्ये ऑनलाइन निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही राज्यातील पहिली ऑनलाइन निवडणूक असणार आहे.

हे वाचा-धारावीनंतर मुंबईतून कोरोनाबाबत आता आणखी एक आनंदाची बातमी

कोकण विभागाचे विभागीय आयुक्त लौकेश चंद्र यांनी पीठासीन अधिकारी म्हणून पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची नियुक्ती केली आहे. निवडीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान ही राज्यातील पहिलीच ऑनलाइन निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार असून कोकण विभागीय आयुक्तांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सुद्धा पत्र पाठविले आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, ते लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर करतील. कोकण विभागीय आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनद्वारे पार पडणार आहे. राज्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने निवडणूक होणार असून आम्ही आमच्या तयारीला सुरुवात केली आहे, अशी माहिती केडीएमसीचे सचिव संजय जाधव यांनी दिली.

Published by: Meenal Gangurde
First published: July 13, 2020, 6:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading