Home /News /maharashtra /

लातूरपाठोपाठ बुलडाण्यातही omicron चा शिरकाव, पहिला रुग्ण आढळला

लातूरपाठोपाठ बुलडाण्यातही omicron चा शिरकाव, पहिला रुग्ण आढळला


बुलडाणा शहरात मंगळवारी एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी हा दुबईवरून परतला आहे.

बुलडाणा शहरात मंगळवारी एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी हा दुबईवरून परतला आहे.

बुलडाणा शहरात मंगळवारी एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी हा दुबईवरून परतला आहे.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 15 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या (omicron) रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. मुंबई, (mumbai) पुण्यापाठोपाठ (pune) आता विदर्भ, मराठवाड्यात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. आता बुलडाणा (buldhana) जिल्ह्यात सुद्धा ओमायक्रॉनने शिरकाव केला असून पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. बुलडाणा जिल्ह्यात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णाचे नमुने पुण्याला पाठवले होते. आज रिपोर्ट हाती आले असता या रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बुलडाणा शहरात मंगळवारी एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी हा दुबईवरून परतला आहे. आणि आठ दिवसांपूर्वी दुबईमध्ये ओमीक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सदर व्यक्तीचा स्वॅब ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.  जिल्हा कोव्हिड यंत्रणेकडे ओमायक्रॉनच्या तपासणीची किट उपलब्ध नाही. त्यामुळे दुबईवरून आलेल्या या व्यक्तीचा स्वॅब पुण्याला पाठवले होते. 'तुझ्याकडे फक्त एकच बिकिनी आहे का ?' मालदीव फोटोंमुळे इलियाना ट्रोल दुबईवरून आलेली ही व्यक्ती चार दिवसांपूर्वी बुलडाण्यात परतली. बुलडाणा येथे राहणारे हे ५५ वर्षीय गृहस्थ दुबईला फिरण्यासाठी गेलेले होते. परत आल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेनं त्यांना गाठलं. विदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहिम जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून राबविली जात आहे. या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली, तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह मिळाला. दुबईमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे या कोरोनाग्रस्ताची ओमायक्रॉन चाचणी घेण्यात आली असता रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, त्याच्या संपर्कात आलेले इतर तीन जण कोरोना निगेटिव्ह आहेत. Jacqueline Fernandez ला टक्कर देणारी Akshara Singh पुन्हा चर्चेत, पाहा PHOTO दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. राज्यात मंगळवारी ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  ८ पैकी ७ रुग्ण मुंबईतील आहे तर १ विरारचा रुग्ण आहे. आठपैकी एकही रुग्णाला तीव्र लक्षणे नाहीत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या इतर रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. राज्यातील ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. आता बुलडाण्यात रुग्ण सापडल्यामुळे रुग्ण संख्या 29 वर पोहोचली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या