मुख्यमंत्र्यांना घेरण्याची काँग्रेसची योजना, ही आहे उमेदवारांची संभाव्य यादी!

मुख्यमंत्र्यांना घेरण्याची काँग्रेसची योजना, ही आहे उमेदवारांची संभाव्य यादी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेल्या नागपूर पश्चिममधून त्यांना घेरण्याची काँग्रेसची योजना असून एखाद्या बड्या नेत्याला तेथून तिकीट दिलं जावू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 18 सप्टेंबर : काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीतील काँग्रेस वॉर रूममध्ये आज बैठक झाली. बैठकीला राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक नेते सहभागी झालेत. आजच्या बैठकीत जवळपास 50 ते 60 उमेदवारांच्या नावांवरती अंतिम निर्णय घेण्यात आला. पहिल्या 50 उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. यातल्या काही उमेदवारांची यादी न्यूज18 लोकमतच्या हाती लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेल्या नागपूर पश्चिममधून त्यांना घेरण्याची काँग्रेसची योजना असून एखाद्या बड्या नेत्याला तेथून तिकीट दिलं जावू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातोय.

ही आहे संभाव्य यादी

काँग्रेसच्या उमेदवारांची संभाव्य यादी

पृथ्वीराज चव्हाण - कराड

अशोक चव्हाण - भोकर

बाळासाहेब थोरात - संगमनेर

यशोमती ठाकूर - तिवसा

विजय वडेट्टीवार - ब्रम्हपुरी

नितीन राऊत - नागपूर उत्तर

नाना पटोले - साकोली

बसवराज पाटील - उमरगा

वर्षा गायकवाड - धारावी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण झालं असून प्रत्येक दोन्हीही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर निवडणूक लढविणार असून मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडणार आहेत. राज्यातली बदलती समिकरणं लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदलही होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसचं डिझास्टर मॅनेजमेंट

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातलं वातावरण अनुकूल नाही हे लक्षात आल्याने कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी काँग्रेसने 'डिझास्टर मॅनेजमेंट'ला सुरुवात केलाय. यासाठी दिल्लीत एक खास योजना तयार केली जात असून त्यात राज्यातल्या 42 दिग्गज नेत्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे आदेश काँग्रेस श्रेष्ठींनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जे नेते कधीही विधानसभा निवडणूक लढले नाही अशा काही नेत्यांनाही विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं जाऊ शकतं. मात्र श्रेष्ठींचा आदेश काँग्रेसचे हे नेते पाळतील का हाच खरा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. अंतर्गत वाद, मतभेद, पक्षातून सोडून जात असलेले नेते, खंबीर नेतृत्वाचा अभाव यामुळे राज्यात पक्ष संघटना खिळखिळी झाली आहे.

राणा जगजितसिंह यांच्यामुळे उस्मानाबादमध्ये भाजप भोपळा फोडणार का?

या विधानसभा निवडणुकीत फार काही हाती पडणार नाही याचा अंदाज आल्याने 'तन-मन-धना'ने किती नेते लढतील अशी शंका व्यक्त केली जातेय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांच्यासह सर्व अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अशा दिल्या सूचना दिल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading