शिवजन्मभूमी साकारणार राज्यातील पहिलं सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मान्यता

शिवजन्मभूमी साकारणार राज्यातील पहिलं सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मान्यता

वाढती लोकसंख्या पाहता व आरोग्य विभागात होत असलेले आर्थिक शोषण थांबविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

जुन्नर, 7 ऑगस्ट : शिवजन्मभूमी अशी ओळख असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पुण्य भूमीतल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मोठ्या उपचारांसाठी इथल्या नागरिकांना दूरवर जायची गरज नाही. कारण आता सहकार विभागाकडून राज्यातील पहिलं सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र आता जुन्नरमध्ये उभारण्याच्या निर्णयाला केंद्र.सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे.

पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून होणारी गर्दी कमी व्हावी, तसंच त्या त्या भागातील स्थानिक ठिकाणी रुग्णांना माफक दरात उपचार मिळावेत, या हेतूने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र सुरू होणार असून त्यास जुन्नरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची माहिती जुन्नरच्या सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांनी दिली.

शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र हे पुणे जिल्ह्यासह राज्यातील पहिलेच अशा स्वरूपाचे सहकारी तत्वावर सुरू होणारे हे केंद्र असणा र आहे.या संस्थेचे मुख्य प्रवर्तक म्हणून डॉ.हनुमंतराव भोसले व सचिव म्हणून डॉ.रामदास उदमले हे काम पाहणार आहेत.

सध्या कोरोना म्हणजेच कोविड 19 या रोगाने थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळावेत व शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा म्हणून कोरोना बाधित रुग्णांना उपचार देण्यासाठी नियोजित कोविड सेंटर सुरू करण्यासाठी सहकार तत्वावर हे सहकारी रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढती लोकसंख्या पाहता व आरोग्य विभागात होत असलेले आर्थिक शोषण थांबविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील सर्व गरीब व गरजूंना अत्यल्प दरात उपचार मिळावेत हेदेखील या रुग्णालयामागील एक उद्दिष्ट आहे.

शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र या संस्थेमार्फत सामाजिक रोग प्रतिबंधक,अंतर्गत सामाजिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविणे, केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम चालू ठेवणे,.रुग्णालयांच्या बाबतीत प्रशिक्षित नर्सेसचा तुटवडा नेहमीच भासतो म्हणून रुग्णालयासबंधी पॅरामेडिकल स्टाफ करीता प्रशिक्षण केंद्र चालविणे, नर्सिंग कोर्सेस बी.पी.एन., ऍक्युप्रेशर थेरपी, स्वच्छता निरीक्षक,डी.एम.एल.टी.हॉस्पिटल मॅनेजमेंट,पब्लिक अनहेल्थ एज्युकेशन,नर्सिंग सेवक,प्रशिक्षण कोर्सेस सुरू करणे,एम.बी.बी.एस.डेंटल,फिजिओथेरपी कॉलेज या सारख्या वैद्यकीय शिक्षण संस्था चालविणे,नागरिकांना चांगले रुग्णालय,दवाखाना अध्यापन,शास्त्रीय, वैद्यकीय तसेच शल्यचिकित्सक मार्गाने योग्य आकारात वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे,नागरिकांना शैक्षणिक सवलती मिळून देणे, यावर मार्गदर्शन होणार आहे.

आपले आरोग्य चांगले कसे ठेवावे याबाबत त्यांना मार्गदर्शन करणे, समाजात आदर्श डॉक्टर निर्माण करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षण सुलभ व्हावे व त्याच्या प्रसारासाठी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे, संलग्न कारण घेणे,चालविणे व वैद्यकीय शिक्षणाचे वर्ग चालविणे,वैद्यकीय साहित्याचे उत्पादन , खरेदी विक्री योग्य दराने करणे असे या संस्थेचे उद्दिष्ट आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: August 7, 2020, 11:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading