मुलाचे रक्ताने माखले हात, बापानेच केली मग गुन्हा लपवण्यास मदत

मुलाचे रक्ताने माखले हात, बापानेच केली मग गुन्हा लपवण्यास मदत

मृत तरूण कृष्णा पिल्ले हा आईची दाढ दुखत असल्याने गोळी आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. पण तो घरी परतलाच नाही

  • Share this:

दौंड, 11 जानेवारी : मुलांने काही वाईट कृत्य केलं तर त्याचे आई-वडील त्याला शिक्षा देता. परंतु, दौंडमध्ये मुलाने केलेल्या खूनाचा प्रकरणात बापानेच मदत केल्याचं समोर आलं आहे.  दौंड शहरात राहणाऱ्या कृष्णा पिल्ले या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून या प्रकरणी मुलगा आणि बापाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन कांबळे याने पूर्वीच्या भांडणाचा मनात राग धरून शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लिंगाळी ग्रामपंचायतच्या आणि दौंड नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनजवळ वॉस्कॉन सोसायटीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जाऊन त्या ठिकाणी कृष्णा पिल्ले याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.

त्यानंतर मुलगा रोहन कांबळे याने केलेलं कृत्य लपवण्यासाठी वडील विजय कांबळे यांनीच पुढाकार घेतला. या दोघांनी कृष्णाचा मृतदेह आपल्याकडे असणाऱ्या मोटरसायकलवरून दौंड शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेरगळवाडी या गावाच्या सामसूम ठिकाणी विहिरीत मृतदेह फेकून दिला. या घटनेमुळे दौंडमध्ये खळबळ उडाली आहे.

मृत तरूण कृष्णा पिल्ले हा आईची दाढ दुखत असल्याने गोळी आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. पण तो घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि दौंड पोलिसांनी चार तासाच्या आत आरोपींना अटक केली. असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहे.

मनोरूग्ण भावाला डॉक्टराकडे दाखवून येत होता भाऊ, वाटेत दगडाने ठेचून केला खून!

दरम्यान, वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर तालुक्यातील बाळदेव परिसरातील नाल्यात दिलीप इंगोले या 47 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून दिलीप इंगोले चा चुलत भाऊ फरार असल्यानं संशयाची सुई त्याच्याकडे फिरत आहे.

बाळदेव परिसरातील रस्त्यालगतच्या नाल्यात नागरिकांना दगडाने ठेचून मारून टाकलेल्या एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मंगरुळपीर पोलीस घटनास्थळी गेल्यावर मृतक हा मोहरी येथील दिलीप इंगोले असल्याची माहिती मिळाली. दिलीप इंगोले हे आपला चुलत भाऊ संतोष इंगोले यास त्याच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी अकोला येथील डॉक्टरकडे घेऊन गेले होते.

त्यानंतर ते दोघे शेलु बाजार वरून मोहरी कडे रात्री 10 च्या सुमारास दुचाकी ने येत असताना दुचाकी पंचर झाली. त्यावेळी संतोष इंगोले हा गाडीवरून उतरून बाळदेव परिसरातील नाल्यातून पळत असल्याचं दिलीप इंगोले यांनी त्यांचा चुलत भाऊ मंगेश इंगोले यांना मोबाईलवरून सांगितलं होतं. त्यांनतर दिलीप इंगोले आणि संतोष इंगोले या दोघांचेही मोबाइल बंद येत होते.

आज सकाळी बाळदेव परिसरातील नाल्यात डोक्यामध्ये दगड घालून निर्घृण खून केलेल्या अवस्थेतील दिलीप इंगोले चा मृतदेह आढळला असून चुलत भाऊ संतोष इंगोले हा फरार असल्याने त्याच्यावर संशयाची सुई फिरत असून हा खुन कुणी आणि कशासाठी केला याचा शोध मंगरुळपीर पोलीस घेत आहेत.

Published by: sachin Salve
First published: January 11, 2020, 10:05 PM IST
Tags: crimedound

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading