सातारा, 5 डिसेंबर: आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईलमध्ये नराधम बाप अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Pornographic videos) दाखवत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढं नाही तर नराधम पती मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ दाखवून पत्नीला तशा पद्धतीनं शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा (Satara, Maharashtra) शहरातील ही घटना असून पोलिसांत पीडित पत्नीनं थेट पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आपल्या मुलीशीही अश्लिल बोलत होता, तसेच सासरे व दीरही आपला छळ करत असल्याचं पीडित महिलेनं म्हटलं आहे.
हेही वाचा...खाण्याची आवड असेल तर सुरू करा हा व्यवसाय; लाखोंमध्ये होईल कमाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये पतीविरुद्ध तर तालुका पोलीस स्टेशनमध्ये सासरे आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती दारुच्या नशेस शिवीगाळ करत होता. तसेच तो मारहानही करत होता. मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून तशा पद्धतीनं शरीरसंबंध ठेवण्यात भाग पाडत होता. तसं न केल्यास मारहाण करत होता, असं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
मुलीशीही अश्लिल बोलायचा बाप...
आरोपी पती आपल्या 17 वर्षीय मुलीशीही अश्लिल संभाषण साधत होता. धक्कादायक म्हणजे मुलीला देखील मोबाईलमध्ये अश्लिल फोटो आणि व्हिडिओ दाखवत होता. त्याचबरोबर सासरे आणि दीर हे देखील आपला मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचं पीडित महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये समोर आली होती. कल्याणमधील शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
आरोपी साईनाथ तारे हे नगरसेविका मनिषा तारे यांचे पती आहेत. आरोपीने पीडित महिलेला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करीत होता. या आरोपीने महिलेवर तिच्याच महागड्या कारमध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी या महिलेला सप्टेंबर 2018 मध्ये बिझनेस प्रपोजलसाठी कल्याण मेट्रो मॉलमध्ये भेटला होता. मात्र महिलेला ते बिझनेस प्रपोजल आवडलं नाही आणि तिने या करारासाठी नकार दिला.
हेही वाचा...लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी मित्राने तरुणाचं गुप्तांग कापलं; रुग्णालयात दाखल
आरोपीने ब्लॅकमेल केले असून APMC मार्केटच्या येथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकचं नाही तर आरोपीने महिलेला तिला, तिच्या पतीला आणि 5 वर्षांच्या मुलाला जीवेमारण्याची धमकी दिली होती. आणि तिच्या मनाविरुद्द नोटरी पेपरवर स्वाक्षरी घेतली होती. आरोपी पीडित महिलेला अश्लिल व्हिडिओ पाठवत असे आणि तिला समाजमाध्यमांवरुनही संदेश पाठवत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Maharashtra