मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतकरी बाप-लेकांना ठरवलं गुंडाची टोळी, पोलिसांच्या कारवाईने बीडमध्ये संताप

शेतकरी बाप-लेकांना ठरवलं गुंडाची टोळी, पोलिसांच्या कारवाईने बीडमध्ये संताप

शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुख्याने पोलिसांवर बळाचा गैरवापर करून सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुख्याने पोलिसांवर बळाचा गैरवापर करून सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुख्याने पोलिसांवर बळाचा गैरवापर करून सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

बीड, 26 ऑगस्ट : बीडमध्ये (beed) तडीपारीच्या विरोधात गावकरी आक्रमक झाले असून एकाच शेतकरी कुटुंबातील (farmer family) बाप लेकांना गुंडाची (goons) टोळी म्हणत खोट्या गुन्ह्यात तडीपार करण्याचे आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसंच, अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांची (beed police) गाडी गावकऱ्यांनी अडवली तसंच गाडी समोर आडवे झोपण्याचा महिलांनी प्रयत्न केला. राजकीय स्वार्थासाठी पोलिसांचा गैर वापरकरून सुडबुद्धीने कारवाई केल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर ठाणे हद्दीतील भवानवाडी गावातील एकाच शेतकरी कुटुंबातील हरिदास मनोहर जगताप, प्रताप हरिदास जगताप, अमोल हरिदास जगताप या तीन पिता पुत्रांना गुंडाची टोळी म्हणत तडीपारीचे आदेश दिले आहेत. या विरोधात गावकरी आक्रमक झाले असून अटकेची कारवाई करायला आलेल्या पिंपळनेर पोलीसांची गाडी अडवून गावकर्‍यांनी दोन तास ठिय्या केला. भारत-पाक महामुकाबल्याआधी पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं BCCI ला कॉपी तसंच राजकीय सूड बुद्धीतून लोकांवर कारवाई केली जात असल्यामुळे महिलादेखील आक्रमक झाल्या होत्या राजकीय लोक पोलिसांचा गैरवापर करून सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. भाजप सातत्याने सरकारवर पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत असताना बीडमधील सत्ताधारी शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुख्याने पोलिसांवर बळाचा गैरवापर करून सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे. 'राज्यपालांनी यादी मंजूर केल्यावर भाजप फुटणार' नाना पटोलेंचा मोठा दावा 'यात स्थानिक सत्तेतील लोक प्रतिनिधी खोटे गुन्हे दाखल करून निर्दोष लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. जिल्ह्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, मटका, वाळू तस्करीचे प्रकार घडत असताना पोलीस प्रशासन शेतकऱ्यांना गुंडांची टोळी तर ठरवून तडीपार करणार असेल तर उद्धव साहेब तुम्हीच आम्हाला न्याय द्या, हात जोडून विनंती आहे तुमच्याच शिवसैनिकाला खोट्या गुन्ह्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. साहेब मला न्याय द्या, अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख हनुमान जगताप यांनी केली आहे. 'या कारवाईच्या विरोधात भवानवाडी गावातील नागरिक आक्रमक झाले आहे. सामान्य शेतकरी कुटुंबाचा गावाला काहीही त्रास नाही मात्र खोटे गुन्हे दाखल करून त्यांना गुंड ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Beed news, Crime

पुढील बातम्या