शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांचे दार खुले, 16 जिल्ह्यात मिळणार कर्ज

शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांचे दार खुले, 16 जिल्ह्यात मिळणार कर्ज

राज्य सरकारने 16 जिल्हे असे निश्चित केले आहेत जिथे राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा केला जाईल

  • Share this:

12 जून : राज्यात शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. आता यात आनंदाची बातमी म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांचे दारही शेतकऱ्यांसाठी खुले करून दिले आहेत.

राज्य सरकारने 16 जिल्हे असे निश्चित केले आहेत जिथे राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा केला जाईल.आज दिवसभरात सरकार या 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. जिथे जिल्हा बँका कर्ज पुरवण्यास सक्षम नसतील, तिथे नॅशनलाईज्ड बँकांकडून कर्ज दिलं जाईल.

या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँका कर्ज देणार

नाशिक

धुळे

नंदुरबार

जळगाव

सोलापूर

परभणी

हिंगोली

जालना

बीड

उस्मानाबाद

नांदेड

यवतमाळ

अमरावती

बुलडाणा

नागपूर

वर्धा

First published: June 12, 2017, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading