औरंगाबाद/मुंबई, 11 डिसेंबर : औरंगाबादमधील तुळजापूर गावातील ज्ञानेश्वर दिगंबर कोठळे यांना 12 मार्च 2018 ची ती वेळ लक्षात आहे, जेव्हा त्यांच्या वडिलांच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला होता. कोटले कुटुंबाला हा दिवस कायम लक्षात राहिल. त्यांना राज्य सरकारकडून एका प्रोजेक्टसाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 23.4 कोटी रुपये मिळाले होते. कोटले कुटुंबाने मुंबई-नागपूर समृद्धी एक्सप्रेसवेसाठी आपल्या 16 एकर वारसा संपत्तीतून 9.05 एकर जमिनीचा भाग दिला होता.
सरकारी कर्मचारी ज्ञानेश्वर (37) म्हणतात की, शेतीतून दरवर्षी आमची 3 ते 5 लाखांपर्यंत कमाई होते. आमच्या कुटुंबाचं जमिनीशी भावनिक नातं आहे. मात्र ज्यावेळी आम्ही जमिनीवर मिळणारी रक्कम पाहिली तेव्हा आमचं मन बदललं.
यापूर्वी शेतकऱ्याच्या जमिन अधिग्रहणाचा केला होता विरोध
2016-17 मध्ये जेव्हा दोन शहरांमध्ये 701 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याची योजना सरू झाली तेव्हा 10 जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विरोध झाला. हजारो शेतकऱ्यांनी भूमी अधिग्रहणाचा विरोध केला. नाशिक आणि औरंगाबाद जिह्यातील अनेक भागात आंदोलन पेटली. त्यावेळी आंदोलनकाऱ्यांनी समृद्धी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या.
किमंत 5 पटीने वाढविल्याने आंदोलन संपलं
हाविरोध पाहून सरकारने भूमी अधिग्रहण पॉलिसीमध्ये मोठा बदल केला. आणि जमिनीच्या किंमतीत मोठी वाढ केली. या किमती बाजार भावापेक्षा पाच पटीने जास्त होत्या. यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन संपलं. एमएसआरडीसीचे वाइस चेयरमैन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राधेश्याम मोपलवार यांनी सांगितलं की, आम्ही आतापर्यंत 34,000 कुटुंबांना 25,000 एकर जमिनीसाठी 8,000 कोटी रुपये दिले आहेत.
प्रोजेक्टचा खर्च 55,335 कोटींचा
औरंगाबादमध्ये एमएसआरडीसीचे डेप्युटी कलेक्टर एचवी अरगुंडे यांनी सांगितलं की, हे भारतातील सर्वात जलद भूमी अधिग्रहण आहे. आणि विशेष म्हणजे हे काम दीड वर्षांत पूर्ण झालं आहे. त्यांनी सांगितलं की, यात उशीर केला असता आम्हाला एका वर्षात 5,600 कोटी रुपयांचं अतिरिक्त नुकसान झालं असतं. शेतकऱ्यांनाचा त्याच्या जमिनीसाठी जास्त किंमत देण्याचा पर्याय योग्य होता. या प्रोजेक्टासाठी 55335 कोटींचा खर्च केल्याचे सांगितले जात आहे.
पुढील वर्षी सुरू होणार हायवे
नागपूर-शिर्डीपर्यंत 502 किमी लांबीचा रस्त्याची निर्मिती पुढील वर्षी मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील वर्षी मुंबई ते नागपूरसाठी हा हायवे तयार होईल. याचे काम वेगाने सुरू आहे. या प्रोजेक्टच्या उभारणीसाठी तब्बल 28000 मजूर काम करीत होते.