Home /News /maharashtra /

Chana Stop Buying : बंडखोर आमदार हॉटेलच्या उबीला तर शेतकरी मात्र केंद्राच्या आडमुठेपणाच्या दावणीला

Chana Stop Buying : बंडखोर आमदार हॉटेलच्या उबीला तर शेतकरी मात्र केंद्राच्या आडमुठेपणाच्या दावणीला

केंद्राने अचानक किमान आधारभूत (Chana stop buying) दराने हरभरा खरेदी बंद केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी (Maharashtra chana crop farmer) चिंतेत आहे

  मुंबई, 29 जून : केंद्राने अचानक किमान आधारभूत (Chana stop buying) दराने हरभरा खरेदी बंद केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी (Maharashtra chana crop farmer) चिंतेत आहे. हरभरा खरेदीचे (chana rate) उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले आहे. यामुळे एकीकडे शेतकरी हवालदिल (Farmers are heartbroken) आहे तर राज्यातील सत्तानाट्यामुळे बंडखोर आमदार (shiv sena mla in guwahati) मात्र बाहेरच्या राज्यात मजा करत असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोण लक्ष देणार याबाबत विचारणा केली जात आहे.

  राज्यात शिवसनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. या सगळ्यात केंद्राने हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे राज्याच्या सत्ता नाट्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्राकडून आधारभूत किमतीने हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या शेतकरी पेचात अडकले आहेत. 

  हे ही वाचा : Farmer : शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात मात्र झाडी, हाटेल, डोंगार करणाऱ्या  बंडखोर आमदारांवर शेतकरी संतप्त

  या शेतकऱ्यांचा माल खरेदी करणार किंवा नाही, या बाबत कुठलीही सूचना देण्यात आलेली नसल्याने शेतकरी निर्णयाकडे आस लावून बसले आहेत. हा प्रश्न बाजूला पडला आहे. यावर कुठलाही राजकीय पक्ष सध्या बोलायला तयार नाही. दर दिवसाला शेतकऱ्यांची जिवाची घालमेल वाढत आहे.

  हमीभावाने यंदाच्या हंगामात मार्चपासून हरभरा खरेदीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 29 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने 23 मे रोजीच खरेदी थांबवण्यात आली. ओरड झाल्याने पुन्हा सुमारे सात लाख क्विंटलची मुदत वाढवून 18 जूनपर्यंत मुदत दिली गेली. मात्र ही खरेदी तीनच दिवसांत झाल्याने 3 जूनपासून सर्व केंद्रे बंद आहेत. असे असले तरी राज्यात अद्याप नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांना हरभरा विक्रीविना आहे. हे शेतकरी हरभरा विकावा की नाही, या विवंचनेत अडकले आहेत.

  हे ही वाचा : महाविकास आघाडीत 'ऑल इज वेल' नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक

  हरभरा खरेदीसाठी उद्दिष्ट वाढीचा प्रस्ताव केंद्राकडे देण्यात आला आहे. त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. आता सत्तेचा खेळ मांडलेला असल्याने कोणीही बोलायला तयार नाही. बाजारात चार हजारांपासून विकत आहे. कमाल दर 4650 पर्यंत आहे. तरीही आधारभूत किमतीपेक्षा हा दर सहाशे ते सातशे रुपयांनी कमी आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Farmer protest, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या