Home /News /maharashtra /

'साहेब, संसार गेलो हो पाण्यात', मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला, VIDEO

'साहेब, संसार गेलो हो पाण्यात', मुख्यमंत्र्यांसमोरच शेतकरी ढसाढसा रडला, VIDEO

तुळजापूरमध्ये काटगाव इथं पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले असता अरविंद माळी या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

उस्मानाबाद, 21 ऑक्टोबर : 'साहेब, आमची जमीन नापिक झाली हो, संसार पाण्यात गेला हो' असं म्हणत एक शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ढसाढसा रडला. मुख्यमंत्र्यांनी  या शेतकऱ्याला धीर देत संपूर्ण संसार उभा करू देणार, असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहे. तुळजापूरमध्ये काटगाव इथं पाहणी करण्यासाठी पोहोचले असता अरविंद माळी या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. 'आमचे संसार उघड्यावर पडले आहे. आमची पिकं पाण्यात गेली, जमीनच वाहून गेली आहे. आता संसार कसा करायचा साहेब, असं म्हणत अरविंद माळी यांना अश्रूंना वाट मोकळली करून दिली. शेतकरी अरविंद माळी यांना रडताना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थांबले. 'दादा धीर धरा, सर्वांची संसारं उभं करून देतो. रडू नको. मी तुमच्यासाठी इथं आलो आहे, यात उपकार करण्यासारखे काहीही नाही. फक्त धीर धरा लवकरच मदत पुरवणार आहे' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अरविंद माळी यांना आश्वासन दिले आहे. काटगाव इथं पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.  'आज मी तुमचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. जवळपास 80 ते 90 टक्के पंचनामे घेण्यात आले आहे. अंदाज पूर्ण आला आहे.  त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ.  शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत दिली जाणार आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत' असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या