Home /News /maharashtra /

धक्कादायक! संतापलेल्या शेतकऱ्यांनं शासकीय कार्यालयातच स्वत: ला घेतलं पेटवून

धक्कादायक! संतापलेल्या शेतकऱ्यांनं शासकीय कार्यालयातच स्वत: ला घेतलं पेटवून

आत्मदहनाचा इशारा देऊनही घेतली नाही दखल, अखेर शेतकर्‍यानं उचललं टोकाचं पाऊल

बीड, 24 नोव्हेंबर: बीड पाटबंधारे विभागाकडून मावेजा मिळत नसल्यानं एका निराश झालेल्या शेतकर्‍यानं शासकीय कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना घडली.  मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत शेतकर्‍याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांवर उपचार सुरु असून तो 50 टक्के भाजल्याचं माहिती मिळाली आहे. शेतकर्‍यानं यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेतली नसल्याने शेतकर्‍याने अखेर टोकाचे पाऊल उचलले. हेही वाचा..लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटायला बोलवून चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, पुण्यातील घटना बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्‍याची जमीन पाटबंधारा विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे. संपादित केलेल्या जामिनिचा मावेजा मिळत नसल्याने सदरील शेतकर्‍याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. मंगळवारी दुपारी शेतकर्‍यानं कार्यालयात पेट्रोल ओतून घेत स्वत: ला जाळून घेतलं. यात शेतकरी 50 टक्के जला आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गेल्या अनेक वर्षापासून शासकीय कार्यालय जमिनीचा मावेजासाठी कामात आहे. मात्र, शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे वैतागलेल्या अर्जुन साळुंखे या शेतकऱ्याने स्वत: वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. राज्य सरकारनं आता तरी आमच्या कुटुंबाचा विचार करावा, अशी मागणी पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी केली आहे. अनेक वर्षांपासून जमिनीच्या मावेजासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारल्या. मात्र न्याय मिळालाच नाही. शेवटी आता आमच्यातला माणूस निघून चालला आहे. आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, अशी मागणी अर्जुन साळुंके यांच्या पत्नी तारामती साळुंके यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला घेतलं पेटवून दरम्यान, गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात अशीच घटना घडली होती. इचलकरंजी शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला पेटवून घेतलं होतं. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीची प्राणज्योत मालवली होती. नगरपालिकेच्या आवारात ही अंगावर शहरा आणणारी घटना घडली होती. नरेश भोरे असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यानं नगरपालिकेत स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. नरेश भोरे यांना तातडीनं सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नरेश भोरे यांच्या निदर्शनास आली होती ही बाब.... गेल्या आठवड्यात शहापूर रस्त्यावरुन मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी चक्क घंटागाडीला बांधून रस्त्यावरुन ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन, गाडीला मृत डुक्कर बांधून ओढत नेण्यास घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरुन संबंधीत गाडीच्या चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करुन भोरे यांना चक्क मेलेले डुक्कर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडलं होतं. हेही वाचा...नाथाभाऊंनी कोरोनाला हरवलं, रोहिणी खडसे यांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज याप्रकरणी कचरा उठाव करणार्‍या संबंधीत ठेकेदार व ठेका घेतलेल्या कंपनीवर पेटा अ‍ॅनिमल कायद्यातंर्गत कारवाई करावी. शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी त्याने सोमवार 26 ऑक्टोबर रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Maharashtra

पुढील बातम्या