मृत्यूचं तांडव पाहिलेलं वृद्ध दाम्पत्य अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत, त्यांची व्यथा वाचून डोळ्यात येईल पाणी!

मृत्यूचं तांडव पाहिलेलं वृद्ध दाम्पत्य अजुनही मदतीच्या प्रतिक्षेत, त्यांची व्यथा वाचून डोळ्यात येईल पाणी!

दारात झाड कोसळल्याने निसर्ग वादळाने बेजार झालेल्या या वृद्ध दाम्पत्यावर आता पुन्हा नवे संकट ओढावले आहे.

  • Share this:

रत्नागिरी 16 जून:  निसर्ग चक्रीवादळाच्या थारार नाट्यात जीव मुठीत घेऊन साडेतीन तास एका वृद्ध दाम्पत्याने घरातल्या एका खोलीत कोंडून घेत आपला जीव वाचवला होता. त्यांच्या दारासमोरच निसर्ग चक्रीवादळात चक्क भलेमोठे आंब्याचे झाडं कोसळले होते.  निसर्ग चक्रीवादळ होऊन बारा दिवस उलटून गेले मात्र  प्रशासनाने  त्यांच्या  घरासमोरचं  झाड  बाजूला करून त्यांचा मार्ग मोकळा करण्याचे सौजन्य दाखवले नाही त्यामुळे  या वृद्ध दाम्पत्यावर घरातच लॉक डाऊन  होण्याची वेळ आली आहे.

दापोली तालुक्यातील पाडले (आडे) गावाला निस॔ग वादळाचा मोठा फटका बसला असून गावातील कमळाकर बागकर आणि त्यांची पत्नी सुगंधा बागकर हे वयोवृद्ध जोडपे आपले प्राण मुठीत घेऊन घराच्या एका कोप-यात निस॔ग वादळाचा जीवघेणा थरार पाहत होते. घराचे छप्पर उडाल्यावर समोर एक भयानक दृश्य दिसले.

बाजुचे जुनाट आंब्याचे झाड तुटून घराच्या दिशेने येतांना दिसले. हा वृक्ष आपले घात करणार या भितीने या वृद्धांना आपले प्राण जाण्याच्या अनाहूत भितीने ग्रासले होते. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारून देवाचा धावा करत होते. इतक्यात आंब्याचे झाड घराच्या काही भागाला घासून अंगणात पडले.

हे वाचा -  कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असतानाच या जिल्ह्यात झाला COVID-19चा उद्रेक

दोघांनीही सुटकेचा निश्वास टाकला तोच घराच्या मागील परसबागेलील फणसाचे झाड घरावर पडले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.    निसर्ग चक्रीवादळाच्या थरार नाट्यत आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला साडेतीन तासाच्या थरारनाट्य नंतर आपले प्राण वाचवण्यात यश मिळाले. परंतु निसर्ग चक्रीवादळाने त्यांचं सगळच हिरावून घेतल्यामुळे आपण काय पाहण्यासाठी जिवंत राहिलो असाच प्रश्न त्यांना पडत आहे. निसर्ग चक्रीवादळाने आपला सगळा संसार उध्वस्त केला आहे आता उतारवयात हा संसार व आपली वाडी पुन्हा कशी उभी करायची याच विवंचनेत हे दाम्पत्य आहे .

दारात झाड कोसळल्याने निसर्ग वादळाने बेजार झालेल्या या वृद्ध दाम्पत्यावर आता पुन्हा नवे संकट ओढावले आहे. त्यामुळे त्यांची चांगली  ससेहोलपट होत आहे. निसर्ग चक्रीवादळ होऊन बारा दिवस झाले तरीही  त्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी त्यांची स्थिती झाली आहे.

हे वाचा -  लडाखमध्ये चिनी सैन्याशी लढताना आलं वीरमरण; लेकीला पाहायची इच्छा राहिली अपूर्ण

आपला जीव वाचवण्यासाठी त्यांचा हा  प्रयत्न होता मात्र सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही व दोघेही सुखरूप बचावले पाऊस सुरू असल्यामुळे त्यांना बाहेर कुठे जाता येत नव्हते तसेच घराच्या मागच्या धारांमध्ये सुद्धा भलेमोठे झाड कोसळले होते. त्यामुळे त्यांना मागेही जाता येत नव्हते व पुढेही जाता, वादळ थांबल्या नंतर मात्र गावातील काही तरुणांनी त्यांच्या घरावरील झाडाच्या फांद्या, पत्रे बाजूला केली, झाड पडविवर पडल्याने त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यांच्या घरासमोरील झाड तोडून बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र काही तासातच त्यांनीसुद्धा हे काम अर्धवट टाकून निघून गेले हे झाड भले मोठे असल्याने त्यासाठी लागणारे कटर गावात उपलब्ध नाही. तसेच सध्या सगळ्यांचीच लगबग सुरू आहे अनेकांच्या वाडीतली झाडे उन्मळून पडली आहेत त्यामुळे बाग साफ करणे घराच्या आजूबाजूची झाडे साफ करणे सगळ्यांसोबत मोठे आव्हान उभे राहिले आहे त्या परिस्थितीमध्ये आता बाकर कुटुंबीय समोरील झाड बाजूला करण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.

 

 

 

First published: June 16, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading