मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आजोबांनी रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावली, अन् डंपरने हर्षलला चिरडले

आजोबांनी रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावली, अन् डंपरने हर्षलला चिरडले


चिमुरड्या हर्षलचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक केली.

चिमुरड्या हर्षलचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक केली.

चिमुरड्या हर्षलचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक केली.

  इम्तियाज अली, प्रतिनिधी

  बोदवड, 26 जून : वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरने चार वर्षीय बालकाने धडक देवून चिरडल्याची ह्रदयद्रावक घटना बोदवड-भुसावळ रस्त्यावरील साळशिंग गावाजवळील सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केली आणि चालकाला

  बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने या परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघातात हर्षल (वय 4, रा.नेरी) या बालकाचा करुण अंत झाला.

  शांताराम हरी इंधाटे (वय 64 जामनेर तालुक्यातील  नेरी बुद्रुक)  हे आपला नातू हर्षलसह दुचाकी (एम.एच 19 डी.एच 9742) ने नेरीहून साळशिंगी येथे आपल्या मोठ्या सुनबाई सरला प्रमोद इंधाटे यांना घेण्यासाठी येत होते.  त्यांचे व्याही बळीराम बाणाईत यांच्या शेताजवळ लघूशंकेसाठी त्यांनी दुचाकी थांबवली असता त्याचवेळी बोदवडकडून भरधाव वेगाने पिवळ्या रंगाच्या डंपरने रस्त्यावर उभ्या असलेल्या हर्षला धडक देत चिरडले.

  ...अन् चोप देणारे हात थांबले, मोबाईल चोरणाऱ्या चोराला लोकांनी दिले सोडून!

  या घटनेत बालकाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतरही डंपर चालकाने वाहन न थांबवता काही अंतरापर्यंत पळ काढल्यानंतर संतप्त जमावाने डंपर चालकाला थांबवले. आणि चांगलाच चोप दिला.

  चिमुरड्या हर्षलचा मृत्यू झाल्यामुळे  संतप्त जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक केली. अखेर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन डंपर चालक प्रकाश भोई  याला अटक केली.

  नोकरदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! PF चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता

  या अपघातानंतर अवैधरीत्या होणारी वाळू वाहतूक पुन्हा ऐरणीवर आली आहे. शिवाय वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांना नंबर नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे तसेच ओव्हरलोड वाहने धावत असताना संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी आता दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे,  बालकाला चिरडणार्‍या वाहनाला नंबर प्लेट नसताना अशी वाहने रस्त्यावर धावतातच कशी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

  संपादन - सचिन साळवे

  First published: