Home /News /maharashtra /

दारुड्याने रिव्हरर्स गिअर टाकला अन् हातगाडीला उडवले, थोडक्यात वाचला तरुण, पुण्यातला LIVE VIDEO

दारुड्याने रिव्हरर्स गिअर टाकला अन् हातगाडीला उडवले, थोडक्यात वाचला तरुण, पुण्यातला LIVE VIDEO

काही महाभाग दारू (Liquor) पिऊ गाडी चालवून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशीच घटना पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) घडली

पिंपरी चिंचवड, 12 जानेवारी : 'दारू पिऊन गाडी चालवू नका', (don't drink and drive) असं आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असतं. पण, काही महाभाग दारू (Liquor) पिऊ गाडी चालवून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालतात. अशीच घटना पुणे (pune) जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (pimpari chinchvad) घडली आहे. एका मद्यधुंद कारचालकाने रस्त्यावर असलेल्या गाडीला जोराची धडक दिली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुभाष वाघमारे असं या मद्यधुंद कारचालकाचे नाव आहे.  सुदैवाने या अपघातात कुणाला दुखापत झाली नाही. पण, एक गरिब हातगाडीवाल्या तरुणाचे प्रचंड नुकसान झाले आहे.  सुदैवाने हातगाडी चालक वेळीच बाजूला झाल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुभाष वाघमारे याने मद्यधुंद अवस्थेत आपल्या मारुती सुझुकी अल्टो कारने घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याने रिव्हरर्स गिअर टाकला पण त्याला कशाचीच सुद नव्हती. त्याने एक्सलेटरवर पाय ठेवला आणि तशीच कार मागे आली. त्यामुळे भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या हातगाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या धडकेनं हातगाडी जागेवरून दूर फेकली गेली. मात्र चालकाने ज्या पद्धतीने गाडी रिव्हर्स घेतली ते पाहून हातगाडी चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  या प्रकरणी शुभम भंडारी याने सुभाष वाघमारे याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या कारचालकाचा  पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या