आता कॉपी करून दाखवा, दहावी-बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर!

आता कॉपी करून दाखवा, दहावी-बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर!

बारावीच्या पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे. तर दहावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणार आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 15 नोव्हेंबर : दहावी आणि बारावीची परीक्षा (10th 12th board exam) ही कॉपीमुक्त व्हावी यासाठी  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Education Board) दरवर्षी प्रयत्न केला जातो. पण, काही परीक्षा केंद्रावर कॉपी करण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळेच आता महामंडळाने थेट ड्रोनच्या (Drone) मदतीने नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या काळात रखडलेल्या  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा आता लवकरच होणार आहे. या पुरवणी परीक्षा आता थेट  ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार आहे, असं वृत्त दैनिक सकाळने दिले आहे.

प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून पेटवून देणाऱ्या प्रियकराला अखेर अटक, 24 तासांत गजाआड

ड्रोनने परीक्षा घेण्याबद्दल सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. राज्यातला ड्रोनच्या निगराणीत परीक्षा घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे. तर दहावीची पुरवणी परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरदरम्यान होणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी 15 केंद्र आहे. बारावीच्या परीक्षेसाठी 2 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहे. तर दहावीच्या परीक्षेला सुद्धा 2 हजार 402 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होणार आहे. तसंच  विभागीय मंडळाने दिलेल्या माहितीनुसार,  माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहे.

धक्कादायक! न्यायाधीशांनी सरकारी बंगल्यात साडीने गळफास घेऊन केली आत्महत्या

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीची परीक्षा झाला होती. त्यावेळी कॉपीबहदाद्दरांना आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात आली होती. पण, संपूर्ण यंत्रणा राबवूनही काही ठिकाणी  कॉपीचे प्रकार घडले होते. पण, यावर्षी मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली होती.

कोरोनाच्या परिस्थितीत परीक्षा होत असल्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर शासकीय नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य पथक हजर असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करणे बंधनकारक असणार आहे.

Published by: sachin Salve
First published: November 15, 2020, 6:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या