Home /News /maharashtra /

रोड रोलरवर पोट भरणाऱ्या चालकाचा त्याच्याच खाली येऊन जागीच मृत्यू

रोड रोलरवर पोट भरणाऱ्या चालकाचा त्याच्याच खाली येऊन जागीच मृत्यू

चनू राठोड यांच्या मृत्यूची बातमी समजताच शेकडो कामगारांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर एकच आक्रोश केला

    शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली, 21 जानेवारी :  रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पांगरी येथे रोडरोलर अंगावरून गेल्याने रोड रोलर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. कर्नाटकच्या बेळगावमधील मजुरीसाठी अनेक कुटुंब दापोली तालुक्यात आली आहेत. गेली अनेक वर्षे राठोड कुटुंब या ठिकाणी मजुरीसाठी वास्तव्यास आहे.  रोड रोलर चालक चनू वानू राठोड आपल्या ताब्यातील रोड रोलर घेऊन मंडणगडकडून दापोलीच्या दिशेने येत होते. तेव्हा  डांगर फाट्यावरील उतारावर रोड रोलरवरील त्यांचा ताबा सुटला आणि रोड रोलर दरीत कोसळला. त्यावेळी राठोड यांनी आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारण्याचा प्रयत्न केला असता रोड रोलर त्यांच्या अंगावरून जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कामगारांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. जळगावातून उपजीविकेसाठी आलेल्या चनू राठोड यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  चनू राठोड यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली आणि पत्नी असा परिवार असून त्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावून घेतला आहे. राठोड कुटुंबाचा पोशिंदा गेल्याने यांचे कुटुंब पोरकं झालं आहे. चनू राठोड यांच्या मृत्यूची बातमी समजताच शेकडो कामगारांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयासमोर एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता.  पाठलाग करून तरुणावर सपासप वार करून हत्या उल्हासनगरमध्ये पाच ते सहा जणांच्या टोळीने एका तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दीपक भोईर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, हत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत हे या तरुणाच्या हत्येचा सीसीटीव्ही पाहिल्यावर समजते. उल्हासनगरच्या नेहरू चौक परिसरात माणेरे गावात राहणाऱ्या दीपक भोईर या तरुणांची पाच ते सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली. हत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अंगावर शहरे आणणारा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या त्याच्याच ओळखीच्या नरेश उर्फ बबल्याने केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपक भोईरचा खून करण्यासाठी त्याच्याच मित्रांनी सापळा रचला होता. शहरातील दुर्गा बारमध्ये दीपकला एका मुलीनं फोन करून बोलावलं होतं. दीपक बारमध्ये पोहोचला आणि संबंधित मुलीची भेट घेतली. त्यानंतर बारमधून बाहेर आल्यानंतर दबा धरून बसलेल्या नरेश उर्फ बबल्या आणि त्याच्या मित्रांनी दीपकवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी दीपकने पळ काढला. हल्लेखोरांनी चाकू-तलवार घेऊन त्याचा पाठलाग केला. काही अंतर दूर गेल्यानंतर दीपक खाली कोसळला. पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी दीपकवर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. यात त्याचा जागीत मृत्यू झाला. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अटक होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी  घेतलाय.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या