धावत्या गॅस टँकरमध्ये ड्रायव्हर पडला बेशुद्ध, चौगुलेंनी 'जे' केले ते ऐकून कराल कडक सॅल्युट!

धावत्या गॅस टँकरमध्ये ड्रायव्हर पडला बेशुद्ध, चौगुलेंनी 'जे' केले ते ऐकून कराल कडक सॅल्युट!

वाहनांची लागलेली टोलवरील रांग, सकाळच्या सत्रात कॅन्टीनवर चहा, नाश्‍ता करायला थांबलेले शेकडो लोक, अशा स्थितीत गॅसने भरलेला टॅंकर कॅन्टीनच्या दिशेने जात होता.

  • Share this:

सोलापूर, 12 सप्टेंबर : सोलापुरात एका जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एखाद्या सिनेमात शोभावी अशी घटना  घडली.  गॅसने भरलेला टॅंकरमध्ये  चालकाला फीट आल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला. मात्र, ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संजय चौगुले यांनी चालता टॅंकरचा ताबा घेत वाहनावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटद्वारे पोलीस कर्मचारी चौगुले यांच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

घडलेली हकीकत अशी की, सकाळचे 8.30 वाजले होते. मुंबई ते सोलापूर हे अंतर रातोरात पार करून गॅसने भरलेला टॅंकर सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर आला. टोल भरून एका मागून एक, असे चार टॅंकर पाकणी डेपोच्या दिशेने निघाले. त्याठिकाणी पोहचल्यावर निवांत आराम करता येईल, या आशेने तीन टॅंकर पुढे गेले. मात्र, शेवटी असलेला टॅंकर नागमोडी वळणे घेत अंगावर येत असल्याची जाणीव तेथील ड्युटीवर असलेले महामार्ग पोलीस कर्मचारी संजय विठोबा चौगुले यांना झाली.

नागपूर हादरले, नुकतेच जगात आलेले बाळ तलावात फेकले!

चौगुले यांनी तत्काळ टॅंकरच्या दिशेने धाव घेतली आणि पाहिले तर काय, चालक उमेश पाटील (रा. खामकरवाडी, उस्मानाबाद) यांच्या हाती स्टेअरिंग नव्हतीच. त्यांनी कोणताही विचार न करता ते टॅंकरवर चढले. चालकाचा अॅक्‍सिलेटरवरील पाय काढून स्वत:चा पाय ब्रेकवर ठेवला आणि टॅंकर जागेवरच थांबविला अन्‌ पुढील मोठा अनर्थ टळला.

मुंबईहून गॅसने भरलेले टॅंकर पाकणी येथील भारत गॅसच्या डेपोवर दररोज ये-जा करतात. नेहमीप्रमाणे बुधवारी मुंबईहून चार टॅंकर एका मागून एक सोलापुरच्या दिशेने येत होते. मोहोळ तालुक्यातील सावळेश्‍वर येथील टोल पास करून तीन टॅंकर पुढे गेले. परंतु, एक टॅंकर मागे होता. टोल भरून तो टॅंकर बूथमधून पुढे पास झाला. मात्र, तो सरळ न येता नागमोडी पध्दतीने इकडे तिकडे असा येऊ लागला. टोलवरील बेशिस्त वाहतूक नियंत्रणात यावी म्हणून त्याठिकाणी दररोज दोन शिफ्टमध्ये महामार्ग पोलीस कारवाईसाठी उभे असतात. त्या दिवशीही सात पोलीस कर्मचारी आणि सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खरात ड्युटीवर हजर होते. त्यातील संजय चौगुले यांचे त्या टॅंकरकडे लक्ष गेले. टॅंकर तर पुढे येतोय, मात्र चालक दिसत नव्हता. हा थरार तीन ते पाच मिनिटे सुरूच होता. काही क्षणात गॅसने भरलेला टॅंकर टोल शेजारील कॅन्टीनच्या दिशेने जात होता. यावेळी असे का होत आहे, याची माहिती न घेता चौगुले टॅंकरच्या दिशेने धावले आणि टँकर थांबवला.

फडणवीसांनी कन्येची शपथ घेऊन दिली होती राज्यपालपदाची ऑफर, खडसेंचा गौप्यस्फोट

वाहनांची लागलेली टोलवरील रांग, सकाळच्या सत्रात कॅन्टीनवर चहा, नाश्‍ता करायला थांबलेले शेकडो लोक, अशा स्थितीत गॅसने भरलेला टॅंकर कॅन्टीनच्या दिशेने जात होता. टॅंकर चालकास फिट आल्याने तो बेशुद्ध पडला होता. तो टॅंकर थांबवून मोठा अनर्थ टाळून देवदूत ठरलेल्या संजय चौगुले यांचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केलं. तसंच महामार्ग पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्यांचे कौतुक केले.

Published by: sachin Salve
First published: September 12, 2020, 5:13 PM IST

ताज्या बातम्या