Home /News /maharashtra /

लायसन्स मागितले म्हणून मुजोर कारचालकाने वाहतूक पोलिसाला नेले 1 किमी फरफटत, LIVE VIDEO

लायसन्स मागितले म्हणून मुजोर कारचालकाने वाहतूक पोलिसाला नेले 1 किमी फरफटत, LIVE VIDEO

पोलिसांनी या कारचालकाकडे लायसन्स मागितले. पण, या चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली.

पोलिसांनी या कारचालकाकडे लायसन्स मागितले. पण, या चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली.

पोलिसांनी या कारचालकाकडे लायसन्स मागितले. पण, या चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली.

नागपूर, 18 डिसेंबर : लायसन्स (License) मागितले म्हणून एका मुजोर कारचालकाने वाहतूक पोलिसाला (nagpur police) कारच्या बोनेटवर बसवून 1 किलोमिटर फरफटत नेल्याची धक्कादायक नागपूरमध्ये घडली आहे. सुदैवाने या घटनेत वाहतूक पोलिसाला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. नागपूरमधील रामदासपेठ भागात ही घटना घडली आहे. आज सकाळपासून रामदासपेठ भागात वाहतूक पोलीस वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एक स्कॉड कार पोहोचली. पोलिसांनी या कारचालकाकडे लायसन्स मागितले. पण, या चालकाने पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर घटनास्थळावरून काढला. यावेळी कारच्या समोरच उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण कारचालकाने गाडीचा वेग वाढवला. त्यामुळे वाहतूक पोलीस थेट कारच्या बोनेटवर जाऊन बसले. पण, तरीही या मुजोर कारचालकाने गाडी थांबवली नाही. ही बाब तिथे उपस्थितीत असलेल्या काही दुचाकीचालकांच्या लक्षात आली. त्यावेळी काही तरुणांनी पाठलाग करून कारचालकाला रोखले. या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातही घडली होती अशी घटना दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात पुण्यातील मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड येथे घडली होती.वाहतूक पोलिसाला700 मीटर अंतरावर फरफटत नेले होते. पूर्वीच्या थकलेले वाहतुक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरण्यास वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर संतापलेल्या एका कारचालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना 700 ते 800 मीटर फरफटत नेण्याचा धक्कादायक घटना घडली होती. विराटचा ऍटिट्यूड चांगला, पण...', वादानंतर गांगुलीचा पहिल्यांदाच कोहलीवर निशाणा! या प्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी हडपसर येथे राहणाऱ्या प्रशांत श्रीधर कांतावर (वय 43) याला अटक केली होती. याबाबत पोलीस हवालदार शेषराव जायभाय (वय 43) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Nagpur

पुढील बातम्या