Home /News /maharashtra /

कुत्र्यांविरोधात तक्रार केली म्हणून श्वानप्रेमीने मागितली खंडणी, डोंबिवलीतील घटना

कुत्र्यांविरोधात तक्रार केली म्हणून श्वानप्रेमीने मागितली खंडणी, डोंबिवलीतील घटना

'रजनी यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिली असून तुम्ही त्यांना त्रास देत आहात, त्या विरोधात मी तुमची तक्रार करू शकतो व तुम्हाला कोर्टात खेचू शकतो'

डोंबिवली, 29 ऑक्टोबर :  भटक्या कुत्र्यांना (Dog) खायला टाकणाऱ्या महिलेच्या तक्रारीवरून एका श्वानप्रेमीने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी (ransom )उकळली. 'आठवड्याभरात उरलेली रक्कम दिली नाही तर मात्र कोर्टात खेचीन आणि मीडियाद्वारे बदनामी करीन', असे धमकावणाऱ्या कथित श्वानप्रेमीच्या विरोधात अखेर विष्णूनगर पोलिसांनी (VishnuNagar Police station) गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंदवून 24 तास उलटूनही हा खंडणीबहाद्दर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पश्चिमेला राहणारे फिलिप मॅथ्यु हे डॉन बॉस्को हायस्कुलचे मुख्यध्यापक असून ते राहत असलेल्या रेतीबंदर रोडला असलेल्या श्री प्रेमनगर सोसायटीचे देखील चेअरमन आहेत. सदर सोसायटीच्या तळमजल्यावरील फ्लट नं. 3 मध्ये राहणाऱ्या रजनी रेवणकर (63) या भटक्या कुत्र्यांना दररोज खायला घालत असतात. त्यामुळे सोसायटीमध्ये कुत्र्यांचा वावर खूप वाढला आहे. भटके कुत्रे सोसायटीतील इतर लोकांवर जोर-जोराने भुंकतात, अंगावर धावतात. रहिवाश्यांच्या दुचाकीचे सिट कव्हर फाडतात. त्यामुळे रहिवासी त्रस्त झालेले आहेत. पदाधिकारी व सदस्यांनी सोसायटीच्या वेळोवेळी आयोजित केलेल्या मिटींगमध्ये सदर मुद्दा उपस्थित करून रजनी रेवणकर यांना समज दिली. Loan Moratorium: कसा आणि किती मिळणार या व्याजमाफीचा फायदा, सरकारनं दिलं उत्तर परंतु, त्या भटक्या कुत्र्यांना खायला घालणे त्या बंद करत नाहीत म्हणून रहिवासी खूप त्रस्त झाले आहेत. सोसायटीचे चेअरमन फिलीप मॅथ्यु यांच्याकडे सर्व रहिवासी वारंवार तक्रारी करत असतात. शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास रजनी रवणकर यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 'तुम्ही कुत्र्यांना सोसायटी आवारामध्ये वा सोसायटीच्या आसपास खायला घालणे बंद करा. कुठेतरी दूर खाडीकिनारी वगैरे मोकळ्या जागेत कुत्र्यांना खायला द्या', अशी समजूत घातली. मात्र, सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास रजनी रेवणकर यांनी चेअरमन मॅथ्यू व लिलाधर पाटकर यांना इमारतीच्या खाली बोलावून घेतले व त्यांनी एका इसमाशी ओळख करून दिली. सदर इसमाने त्याचे नाव चेतन शर्मा असल्याचे सांगितले. 'आपण श्वानप्रेमी असून सामाजिक कार्यकर्ते आहेत. भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासंदर्भात काही बोलावयाचे असल्यास आपण यांना सांगू शकता, ते तुमच्याशी बोलतील', असे सांगून रजनी रेवणकर या त्यांच्या घरी गेल्या. त्यानंतर चेतन शर्मा याने स्वतःची ओळख सांगतानाच, 'रजनी यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिली असून तुम्ही त्यांना त्रास देत आहात, त्या विरोधात मी तुमची तक्रार करू शकतो व तुम्हाला कोर्टात खेचू शकतो' अशा धमक्या दिल्या जर तुम्हाला हे प्रकरण वाढवायचे नसेल तर मला 25 हजार द्या अशी मागणी केली. या कथित श्वानप्रेमीच्या धमक्यांना घाबरलेल्या चेअरमन फिलीप मॅथ्यू यांनी त्यांच्याजवळ असलेले 10 हजार रूपये त्याच्या हातामध्ये दिले व आपण असे काही करू नका, असे बोलले. धक्कादायक! अंघोळीसाठी नदीत उतरले अन् घात झाला...6 युवकांचा बुडून मृत्यू मात्र, पैसे हाती पडताच सोसायटीवाले घाबरले आहेत, असे लक्षात येताच उर्वरित 15 हजारांची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणात घाबरलेल्या मॅथ्यू व लीलाधर पाटकर यांनी सोसायटीतील सदस्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, मॅथ्यू व पाटकर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी चेतन शर्मा अद्याप फरार आहे. तर गुन्हा नोंदवून 24 तास उलटूनही खंडणीबहाद्दर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या