डॉक्टर नव्हे नराधम, उपचारासाठी आलेल्या विवाहितेवर केला बलात्कार

डॉक्टर नव्हे नराधम, उपचारासाठी आलेल्या विवाहितेवर केला बलात्कार

सदर घटनेची माहिती फिर्यादी महिलेने आपल्या पतीला दिल्यानंतर पतीने श्रीवर्धन पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली.

  • Share this:

रायगड, 21 एप्रिल : राज्यावर कोरोनाचे (Corona) संकट ओढावलेले आहे, अशा या परिस्थितीत डॉक्टर (Doctor) आणि आरोग्य यंत्रणा आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांचे प्राण वाचवत आहे. पण दुसरीकडे रायगडमध्ये (Raigad) एका डॉक्टराने डॉक्टरी पेशाला काळीमा फासला आहे. तपासण्याच्या बहाण्याने या नराधमाने एका महिलेवर बलात्कार केला आहे. या नराधमाला अटक करण्याात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण बंदरकर (Praveen Bandarkar) असं या नराधम डॉक्टरचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन बाजार पेठेत असलेल्या प्रवीण बंदरकर यांच्या दवाखान्यात पाच दिवसांपूर्वी फिर्यादी महिला छातीत दुखत असल्यामुळे दवाखान्यात गेली होती. सदर महिलेची तपासणी केल्यानंतर सदर महिलेस गोळ्या देऊन  रविवारी येण्यास सांगितले होते.

Explainer: छोट्या क्यूबा देशात विकसित होतायेत 5 लशी;परदेशातून नाही घेतली एकही लस

रविवारी क्लिनिक बंद असल्यामुळे फिर्यादी महिला सोमवार  सायंकाळी 5.30 वाजता दवाखान्यामध्ये गेली असता. तपासणी दरम्यान डॉक्टर विचित्र प्रकार करत असल्याचे जाणवले याबाबत विचारणा केली असता तपासत असल्याचे सांगितले. तसंच महिला एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला.

सदर घटनेची माहिती फिर्यादी महिलेने आपल्या पतीला दिल्यानंतर पतीने श्रीवर्धन पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीसोबत Divorce घेतल्यानंतर 30 वर्षीय तरुणीने आपल्या सासऱ्याशी बांधली लग्नगाठ

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी डॉक्टर प्रवीण बंदरकर यांची वैद्यकीय तपासणी करून त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी .एस आय एस .के. गावडे करीत आहेत.

आरोपी प्रवीण बंदरकर याने फिर्यादी महिलेला पाच दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या गोळ्या या कोणत्या आजारावर दिल्या होत्या? याचाही तपास करून क्लिनिकमध्ये असलेल्या इंजेक्शन तसंच गोळ्या कोणत्या आजारावर आहेत याचा तपास करत आहेत. घडलेल्या या घटनेमुळे रायगडमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 4:53 PM IST
Tags: raigad

ताज्या बातम्या