मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जिल्हाधिकारी आले धावून, बंदमध्ये अडकलेल्या 40 प्रवाशांना सुखरुप पोहोचवलं घरी

जिल्हाधिकारी आले धावून, बंदमध्ये अडकलेल्या 40 प्रवाशांना सुखरुप पोहोचवलं घरी

अमरावतीच्या जिल्हाधिकारींनी आधी त्या सर्वांची तपासणी करुन घेतली आणि त्यानंतरही त्यांना घरी पोहोचवलं.

अमरावतीच्या जिल्हाधिकारींनी आधी त्या सर्वांची तपासणी करुन घेतली आणि त्यानंतरही त्यांना घरी पोहोचवलं.

अमरावतीच्या जिल्हाधिकारींनी आधी त्या सर्वांची तपासणी करुन घेतली आणि त्यानंतरही त्यांना घरी पोहोचवलं.

अमरावती, 22 मार्च : कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi ) देशभरात जनता कर्फ्युचं (Janata Curfew) आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था बंद होती. मात्र अमरावती बसस्थानकावर तब्बल 30 ते 40 प्रवास अडकून पडलेले होते. कोणतंही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांना घरी जाता येत नव्हते.

मुंबईहून (Mumbai) अंबा एक्स्प्रेसने मोठ्या प्रमाणात प्रवासी अमरावतीमध्ये (Amravati) दाखल झाले होते. यापैकी 30 ते 40 जन अमरावती बसस्थानकावर गाडी पकडण्यासाठी आले होते.  यामध्ये महिला, मुले व गर्भवती महिलांचा समावेश होता. यातील बहुतांश वरूड मोर्शीचे रहिवासी होते. बसस्थानकावर आल्यावर एकही वाहन नसल्याचे कळल्यावर त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं. बस तर बंद होतीच मात्र सर्व हॉटेल्सही बंद असल्याने प्रवासी बसस्थानकावर अडकून पडले. यापैकी कुणाचीही कोरोना तपासणीसुद्धा करण्यात आली नव्हती.

हे वाचा - कोरोनाचा फटका, नाशिकच्या कारखान्यात नोटांची छपाई बंद

न्युज 18 लोकमतच्या  प्रतिनिधीने ही बाब जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी तत्परतेने एका बसची व्यवस्था करून दिली. प्रथम या सर्वांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्वांना बसमध्ये बसवून त्यांच्या गावी सोडण्यात आलं. जिल्हाधिकारी यांनी तत्परता दाखवल्याबद्दल प्रवासी जगदीश कुकडे यांनी त्यांचे आभार मानले. अडचणीत जिल्हाधिकारी धावून आल्याबद्दल सर्वच प्रवाशांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

हे वाचा -  VIDEO सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली लोकांनी काढल्या मिरवणुका, नागरिक संतप्त

First published:

Tags: Corona virus in india