Home /News /maharashtra /

का चालली ही मुलं आगीतून? पालघरच्या विद्यार्थ्यांना मिळतंय विशेष प्रशिक्षण

का चालली ही मुलं आगीतून? पालघरच्या विद्यार्थ्यांना मिळतंय विशेष प्रशिक्षण

पालघरच्या भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थांना भूकंपापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने प्रशिक्षण दिलं आहे.

पालघर, 19 फेब्रुवारी - मुंबईपासून अवघ्या 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमध्ये आतापर्यंत अनेकवेळा झालेल्या भूकंपांमुळे पालघर जिल्ह्यातील जनता मोठ्या दहशतीत आहे. पालघरमध्ये आतापर्यंत जवळपास हजारच्यावर सौम्य ते तीव्र स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले आहे. तर सगळ्यात तीव्र धक्का 4.1 रिश्टल स्केल होता. पालघर जिल्ह्यतील डहाणू आणि तलासरी या तालुक्यांना भूकंपाचा धोका आतापर्यंत सर्वात जास्त वेळा जाणवला आहे. आतापर्यंत झालेल्या भूकंपांमध्ये 2 जणांचा बळीही गेला आहे. तर स्थावर मालमत्तांचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तलासरी आणि डहाणू तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणावर भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मध्यंतरी काही काळ या गावकऱ्यांनी तर रात्री मैदानांवर झोपून काढल्या. विद्यार्थ्यांच्या शाळाही मैदानात भरत होत्या. अशी या भूकंपाची सगळ्यांनी दहशत घेतली आहे. केंद्राचे भूगर्भ अभ्यासक पालघरमध्ये येऊन याची पाहणीही करून गेले. मात्र हे भूकंप का आणि कशामुळे होतात त्याच्यावर अजूनही अभ्यास सुरू आहे. भूकंपापासून बचावासाठी अनोखं प्रशिक्षण आता भूकंप झालाच तर त्याच्याशी दोन हात करण्याचं पालघरवासीयांनी ठरवलं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना भूकंपातून संरक्षणाचं विशेष प्रशिक्षण द्यायचा निर्णय घेतला. भूकंपापासून वाचण्यासाठी पालघरमधील मुलांना एक अनोखं ट्रेनिंग देण्यात आलं आहे. भूकंप झाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याचा संभव असतो. त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात आलं. विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रात्यक्षिकही केलं. पालघर जिल्हा प्रशासनाकडून हे प्रशिक्षक देण्यात येत आहे. पहिल्यांदा जमिनीवर वर्तमानपत्रांचे कागद अंथरले गेले आणि त्यानंतर पेट्रोल शिंपडून त्याला आग लावण्यात आली. त्यानंतर या आगीच्या झळांमधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. ज्यामुळे या भूकंपबाधित क्षेत्राच मुलांना भूकंपाच्या परिस्थितीमध्ये प्रसंगावधान राखून कसा बचाव करता येईल याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणामुळे या मुलांना भूकंपाच्या संकाटाच्या वेळी धाडसाने बाहेर पडण्याला मदत होणार आहे. आणि त्यांच्यामध्ये त्या संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धाडसही निर्माण झालं आहे. ----------------- अन्य बातम्या अजित दादा, आपण उगाच वेगळे राहिलो, आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे 'देश हम सबको चलाना है...', रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Maharashtra, Palghar

पुढील बातम्या