Home /News /maharashtra /

हत्ती सोडला आणि.., दारू विक्रीच्या निर्णयावर डॉ.अभय बंग म्हणाले...

हत्ती सोडला आणि.., दारू विक्रीच्या निर्णयावर डॉ.अभय बंग म्हणाले...

काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय आहे, असा प्रश्नही बंग यांनी उपस्थित केला आहे.

गडचिरोली, 04 मे : 'मोदी सरकार आणि महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रसार थांबविण्यासाठी अतिशय स्तुत्य पावले आतापर्यंत उचलली. पण रविवारी लॉकडाउनचा दुसरा टप्पा संपता संपता देशातील रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्वच ठिकाणी दारूबंदी उठवली. हा निर्णय अतर्क्य आणि तितकाच धोक्याचा', असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली आहे. 'कोरोनामुळे आजच्या तारखेपर्यंत भारतात 42 हजारावर लोकांना कोरोना आजाराचा संसर्ग झाला आहे तर 1300 च्या पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाले आहे. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्याच वेळी भारतात दर वर्षी दारूमुळे 5 लक्षं मृत्यू होतात. भारतातील 5 कोटी लोकं दारूच्या व्यसनाने ग्रासित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना सांगत आहे. म्हणजे कोरोना संसर्ग आणि होणार्‍या मृत्यूपेक्षा दारूचे व्यसन आणि त्यामुळे भारतात होणारे मृत्यू हजार पटीने जास्त आहे', अशी माहिती बंग यांनी दिली. हेही वाचा - पुण्यात दारू विक्रीबद्दल मोठी बातमी, प्रशासनाने केली महत्त्वाची घोषणा तसंच, 'कोरोना फैलाव रोखण्यासाठी अनेक प्रकारची बंदी कायम ठेवताना शासनाने दारूच्या विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने हत्ती सोडला आणि शेपूट धरून ठेवले आहे. त्यामुळेच हे अतर्क्य पाऊल' असल्याचे डॉ. बंग म्हणाले. दारूची दुकाने उघडल्याने तिथे गर्दी होणार आणि सुरक्षित अंतर पाळले जाणार नाही ही शक्यता जास्त आहे. तिथे नियमही तोडले जातील. या गर्दीमधून पुरुष दारूच्या बाटलीवाटे घरी कोरोना घेऊन येतील. सोबतच घरपोच हिंसाही घेऊन येतील, अशा शब्दांत अभय बंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हेही वाचा -नागपुरात दारू विक्री सुरू होणार की नाही? तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली भूमिका जनतेचे हीत आणि आरोग्य हा जर शासनाचा हेतू आहे, तर अशा निर्णयामुळे त्यावर पाणी फेरले जात असल्याचं मत डॉ. बंग यांनी व्यक्त केले. काम बंद, कमाई बंद पण दारू सुरू हे करण्यामागचे रहस्य काय आहे, असा प्रश्नही बंग यांनी उपस्थित केला आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या