भास्कर मेहरे, प्रतिनिधी
यवतमाळ, 20 ऑक्टोबर : जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील आयता इथं शेतात वीज कोसळल्याने एका तरुण मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
तेजस नागोराव मेश्राम असं मृतकाचे नाव आहे. आयात येथे एका शेतकऱ्याच्या शेतात सोयाबीन काढण्याचे काम सुरू होते. संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस आला. तेव्हा सोयाबीन काढणारे सर्व मजूर अंगावर ताडपत्री घेऊन एका ठिकाणी उभे होते.
कोरोना परिस्थितीचा आता असाही परिणाम; तु्म्हालादेखील अशी स्वप्नं पडतायेत का?
त्याच, दरम्यान तेजसच्या अंगावर वीज कोसळली त्यात तो जागीच ठार झाला. तर त्याच्या शेजारीच उभे असलेले कृष्ण मेश्राम, मनोज मेश्राम हे दोघे जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
पुढचे 4 महिने पावसाची शक्यता
तर दुसरीकडे राज्यात आणि देशात धुमाकूळ घालणारा पाऊस शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. फक्त भारतातच नाही तर दक्षिण आशियावर आलेलं पावसाचं संकट आणखी किमान 4 महिने कायम राहणार असल्याचा दावा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया कृषीहवामान फोरमचे सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी केला आहे. साबळे म्हणाले, पुढचे 4 महिने दक्षिण आशियात पाऊस धुमशान घालू शकतो
यांचं भलतच! बिहारमध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार चक्क म्हशीवर स्वार
ऑगस्टपासून दक्षिण आशियावर ला निनाचा प्रभाव आहे. ला निना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण होणं. सध्या महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे.
पावसामुळे काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं, पिकं आणि माती वाहून गेली. अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात माती खरडल्यानं शेतीच्या नापिकीचा धोका वाढला आहे.