24 एप्रिल : उन्हाचा पारा ४२वर पोहचल्याने शेतामध्ये काम करणाऱ्या विठ्ठल कृष्णा लोखंडे ( वय ५८, रा. माळशिरस ) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या वाढणारी उष्णता जिवघेणी आहे. त्यात भर उन्हात शेतात काम करणं म्हणजे आपल्या जीवाशी खेळ करण्यासारखं आहे. यात तडाख्याच्या उन्हाने शेतमजूराचा मृत्यू झाला आहे.
कृष्णा लोखंडे हे एका शेतकऱ्याच्या शेतात मका काढण्याचं काम करीत होते. मका तोडत असताना उन्हाचा तीव्र झटका बसल्याने औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातंवडे असा परिवार आहे.
ते माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे यांचे चुलत बंधू होते. विठ्ठल लोखंडे यांच्या कुटुंबियांना आपत्तीकालीन योजनेतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आप्पासाहेब लोखंडे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.