अमरावती, 26 एप्रिल: अमरावती (Amravati) जिल्हा कोविड रुग्णालयात (Covid Hospital) दाखल केलेल्या 75 वर्षीय रुग्णाचा 2 दिवसापूर्वी शहरातील सिद्धार्थ नगर (Sidharath Nagar) परिसरात मृतदेह (Dead body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र रुग्णालय प्रशासन वृद्ध आमच्याकडेच उपचार आहे, असे नातेवाईकांना सांगत होते. त्यामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
धामणगाव तालुक्यातील 75 वर्षीय वृद्धाला त्यांचा मुलगा व जावई यांनी 22 एप्रिल रोजी अमरावतीच्या जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होतं. नातेवाईकांनी 23 एप्रिल, 24 एप्रिल व 25 एप्रिल रोजी जेवणाचा टिफीन दिला. त्या टिफीनमध्ये त्यांनी जेवण केले व त्यांची प्रकृती चांगली आहे, असे रुग्णालयाच्या काऊंटर वरून सांगण्यात आले. मात्र त्या वृद्धाचा मृतदेह 24 एप्रिल रोजी सकाळीच सिद्धार्थ नगर परिसरात आढळून आल्याचे पोलीस सांगत आहे, त्यांनी त्या मृतदेहाची अनोळखी इसमाचा मृतदेह अशी नोंद सुद्धा घेतली.
झोका खेळताना फास बसून 7 वर्षीय चिमूरडीचा मृत्यू; अक्कलकोटमधील हृदयद्रावक घटना
मात्र वृद्धाचा नातेवाईकांनी एका वॉर्ड बॉयला विश्वासात घेऊन 25 तारखेला वॉर्डमध्ये पाहायला लावले. तेव्हा वृद्ध रुग्णालयात नसल्याचे त्यांना समजले. तिकडे गाडगे नगर पोलिसांना आढळलेला अनोळखी इसम आपले वडील असल्याची ओळख त्यांच्या मुलाने पटवली. रुग्णालयातून 24 तारखेला रुग्ण गायब असताना रुग्णालयाला कसे माहीत झाले, आमचा रुग्ण रुग्णालयाच्या ताब्यात असताना गायब झाला कसा? आम्ही रोज दिलेले टिफीन गेले कुठे असा सवाल नातेवाकानी करत रुग्णालय प्रशासनची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर विराटसाठी नवी डोकेदुखी, आता खेळणं होणार अवघड
जेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींनी कोविड रुग्णालयात विचारणा केली,त्यानंतर रुग्ण गायब झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्णालयाने गाडगे नगर पोलिसात रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ सतीश हुमने यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Death, Maharashtra, Shocking news