'सिलेंडर'चा ट्रक पुलाला धडकला, 100 सिलेंडर नदीत गेले वाहून

'सिलेंडर'चा ट्रक पुलाला धडकला, 100 सिलेंडर नदीत गेले वाहून

अपघातातमुळे ट्रकमधे सगळे सिलेंडर नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग होता. त्यामुळे पाण्यात सगळीकडेच सिलेंडर दिसून लागल्याने एकच खळबळ उडाली.

  • Share this:

कोल्हापूर 30 जुलै : कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. संतधार पावसाने रस्तेही निसरडे झाले आहेत. जिल्ह्यातल्या आजरा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ट्रक नदीवरच्या पुलाला धडकला. यात ट्रकचा भाग पुलाकडे झुकला गेला. या ट्रकमध्ये सिलेंडर होते. अपघातातमुळे ट्रकमधे सगळे सिलेंडर नदीत पडले. पावसामुळे नदीच्या पाण्याला वेग होता. त्यामुळे पाण्यात सगळीकडेच सिलेंडर दिसून लागल्याने एकच खळबळ उडाली.

हा ट्रक कोल्हापूरकडे जात असताना व्हिक्टोरिया पुलावर हा अपघात झाला. वेगात असलेला ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. त्यामुळे सगळे सिलेंडर नदीच्या पाण्यात पडले. हे सिलेंडर रिकामे असल्याने मोठा अनर्थ टळला. सिलेंडर रिकामे असल्याने ते नदीच्या पाण्यात तरंगू लागले.

राज्य सरकारची नवी योजना, 10 लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

या सिलेंडरमध्ये जर गॅस असता तर मोठा अनर्थ घडला असता. अपघातामुळे अशा सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यताही असते. या घटनेची माहिती कळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. सर्व रिकामे सिलेंडर गोळा करण्याचं काम सुरू आहे. नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे सिलेंडर्स विविध ठिकाणी जाऊन अडकले आहेत. तर काही सिलेडंर्स प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत.

गाडीतून खाली पडलेले सर्व सिलेंडर्स पुन्हा जमा करणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे.

शाळा सोडली पण छेडछाड थांबली नाही, 10 वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

पुन्हा मुसळधार पावसाचा धोका

मुंबई आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस उसंत घेण्याची काही शक्यता नाही. पुढचे चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे पाच दिवस रायगड आणि कोकणात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. या सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

राष्ट्रवादी करणार पलटवार, नवी मुंबईतील खेळी भाजपवरच उलटवण्यासाठी नेते मैदानात

गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. उष्माही प्रचंड प्रमाणात वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबईजवळच्या कर्जत आणि वांगणी परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाल्याने उल्हास नदी ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे हा परिसर पूर्ण पाण्याने वेढला होता. त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याने NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं. एक्सप्रेसमधल्या 1 हजारांपेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 03:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading