वऱ्हाडी क्रुझरची ट्रॅक्टरला धडक, पाठीमागून रिक्षाही आदळली; विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

वऱ्हाडी क्रुझरची ट्रॅक्टरला धडक, पाठीमागून रिक्षाही आदळली; विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडाच्या दोन क्रूझरची आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक बसल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत

  • Share this:

बालाजी निरफळ, प्रतिनिधी

उस्मानाबाद, 19 डिसेंबर : सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील जकेकूर गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर लग्नाच्या वऱ्हाडाच्या दोन क्रूझरची आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक बसल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. याच पाच जण गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. दरम्यान, हा अपघात चार वाहनामध्ये झाला आहे. खडीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर चुकीच्या दिशेनं आल्यानं क्रुझर जीपची धडक बसली. त्या पाठीमागे असलेली क्रुझर जीप आणि ऑटोरिक्षा पहिल्यांदा धडक बसलेल्या क्रुझरवर आदळली.

मंद्रुप येथील चंद्रकांत ख्याडे यांच्या मुलीचा विवाह समारंभ कर्नाटकातील बस्वकल्याण असल्यानं त्या लग्नासाठी मंद्रुप येथून क्रुझर जीपने वऱ्हाडी मंडळी निघाली होती. दोन क्रुझर एका पाठीमागून उमरग्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. जकेकूर गावातून ते जात असताना अचानकपणे समोरून चुकीच्या दिशेने जकेकुर गावात निघालेल्या ट्रॅक्टरची ( क्र. एम.एच. २५ / ५९११) क्रुझरशी ( क्र .एम. एच.१३ डीई ५७२७) जोरदार धडक बसली. त्याच क्षणी पाठीमागे असलेली क्रुझर ( क्र.के.ए.२९ एम.२७११) धडक बसलेल्या क्रुझरवर आदळली.

त्याचवेळी या क्रुझरवर पाठीमागून प्रवाशी घेऊन निघालेला ऑटोरिक्षा आदळला. या विचित्र अपघातामुळे चारही वाहनातील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या अपघातील क्रुझरमधील गुरूनाथ मलाकरी लच्चाने (वय ५८) राहणार मंद्रुप ( सोलापूर ) आणि लक्ष्मण भिमप्पा नांदणीकर वय ५२ वर्ष राहणार ऐनापूर तालुका आतणी ( बेळगांव) या दोघांचा मृत्यू झाला.

क्रुझरमधील जखमींची नावे पुढीलप्रमाणे

बहुतांश जखमी आणि मयत हे मंद्रुप, सोलापूर येथील रहिवाशी आहे. गुरूनाथ सिद्धलिंग माळी वय ५० वर्ष, श्रीशैल्य अमोक्षित कुंभार वय ५० वर्ष, गौरीशंकर भगवान सुतार वय ६० वर्ष, कन्नाप्पा विठ्ठल धुळखेडे वय ६० वर्ष, आप्पाशा सिद्राम लोभे वय ४४ वर्ष, जगदेव विठ्ठल धूळखेडे वय ६३ वर्ष, महादेव सुर्याप्पा शेळे वय ६५ वर्ष, मळसिद्ध विरप्पा मुगळे वय ५५ वर्ष, शिवानंद कल्लप्पा नंदुरे वय ६५ वर्ष ( रा. सर्वजण रा. मंद्रुप ( जि. सोलापूर ). रमेश जिवाप्पा कांबळे वय २१ वर्ष रा. विंचूर ( जि. सोलापूर ), दुर्योधन महादेव नांदणीकर वय ६५ रा. ऐनापूर ( बेळगांव). अॅटोरिक्षातील जखमी : लतिफ रहेमान मातोळे वय ४५ वर्ष, रियाज जिलानी जमादार वय ३२ वर्ष, संतोष गणेश जाधव, मानव दत्ता गायकवाड ( रा. सर्वजण जकेकूर ता. उमरगा). दरम्यान वऱ्हाडाच्या वाहनातील सर्व जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.

First published: December 19, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading