Home /News /maharashtra /

आता कसं लेकरांना खाऊ घालू? वाहून गेली पिकं पाहून शेतकरी महिलेला रडू फुटले VIDEO

आता कसं लेकरांना खाऊ घालू? वाहून गेली पिकं पाहून शेतकरी महिलेला रडू फुटले VIDEO

गावातील पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकर जमिनीवरील पीक व जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं राहिलं आहे.

गावातील पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकर जमिनीवरील पीक व जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं राहिलं आहे.

गावातील पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकर जमिनीवरील पीक व जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं राहिलं आहे.

बीड, 08 सप्टेंबर : मुसळधार पावसाने (rain) बीडमध्ये (beed) हाहाकार उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकं पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहे. गेवराईमध्ये (Georai) पिकं वाहून गेल्यामुळे एका शेतकरी महिलेला अश्रू अनावर झाले. गेवराई तालुक्यातील आमला धानोरा या गावातील पाझर तलाव फुटल्याने शेकडो एकर जमिनीवरील पीक व जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभं राहिलं आहे. हातचे पिकं निघून गेल्यामुळे महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे. इंदूबाई धायगुडे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. कसंबसं त्यांनी पिक घेतलं होतं. पण सर्व पिक वाहून गेलं. त्यामुळे इंदूबाईंना अश्रू अनावर झाले आहे. 'आम्ही जगावं कसं' असा प्रश्न इंदूबाई धायगुडे यांनी उपस्थित केला आहे.   शेतकऱ्याची उडाली दाणादाण, खरीप पिके पाण्यात जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघु-मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. तर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा, कुंडलिका, मनकर्णिका सरस्वती, यासह जवळपास सर्वच गाव नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक नद्यांचं पाणी शेतामध्ये घुसलं आहे. यामुळे लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहेत. गेवराई तालुक्यातील पाच पाझर तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरवरील जमीन खरडून गेले आहे तसंच पीक नेस्तनाबूत झाले आहे. यामुळे शेतकऱ्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे वादात व्यस्त आहेत, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बीडचे पालकत्व घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. कायद्यानुसारच Condom वापरावा लागणार; सेक्सदरम्यान एक छोटीशी चूक केली तरी शिक्षा बीड तालुक्यातील खामगाव परिसरातून वाहणाऱ्या सिंदफणा नदीला, गेल्या तीन दिवसांपासून पूर असल्याने, या नदीचे पाणी शेतामध्ये घुसलं आहे. यामुळं पिकं पाण्याखाली गेले आहे. तर शेतात राहणाऱ्या बुधनर नामक शेतकऱ्याचं घर देखील वाहून गेलंय. सध्या पूर काहीसा कमी झाला असला तरी गेल्या पाच सहा दिवसांपासून खामगाव परिसरातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे. पिकाचे प्रचंड नुकसान झाला असून कापूस सोयाबीन तूर पीक हातातून गेले असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली, नंदाबाई बुधनर यांच्या डोळ्यात अक्षरश : पाणी तरळले तीन चार दिवसांच्या पावसाने होत्याचं नव्हतं केलं पिकावरील स्वप्न मातीमोल झाली आता कुटुंबाला जगावं कसं असा प्रश्न नंदाबाई यांच्यासमोर आहे नंदाबाई सारख्या शेकडो शेतकऱ्यांचे दुःख हेच आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या