जळगाव घरकुल घोटाळा: ऐतिहासिक निर्णय, सुरेश जैन यांना 7 वर्ष शिक्षा आणि 100 कोटींचा दंड!

सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी हे आदेश दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 05:41 PM IST

जळगाव घरकुल घोटाळा: ऐतिहासिक निर्णय, सुरेश जैन यांना 7 वर्ष शिक्षा आणि 100 कोटींचा दंड!

जळगाव, 31 ऑगस्ट : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सर्व 48 आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. सर्व संशयित 48 आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. विशेष जिल्हा न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी हे आदेश दिले आहेत. माजी मंत्री सुरेश जैन यांना 7 वर्ष कारावास आणि 100 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे तर प्रदीप रायसोनी 7 वर्ष शिक्षा आणि 10 लाख दंड, राजेंद्र मयूर आणि जगन्नाथ वाणी यांना 7 वर्ष कारावास आणि प्रत्येकी 40 कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे.

राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल आज लागला आहे. धुळे जिल्हा न्यायालयात विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ या हा निकाल दिला आहे. या निकालात माजी मंत्री सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या राजकीय भविष्याचा फैसला झाला आहे. एकूण 47 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे.

या प्रकरणात सुरुवातीला 57 संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 48 संशयितांबाबत हा निकाल देण्यात आला आहे. सर्व संशयित आणि त्यांच्या वकीलांना न्यायालयात हजर राहण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. धुळे न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

काय आहे जळगाव घरकुल घोटाळा?

'घरकुल योजना' ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती.

Loading...

मात्र, या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खानदेश बिल्डर्सला हे काम दिले. या ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने सुमारे 29 कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.

इतर बातम्या  - बाप्पाच्या आगमनाआधी 'या' भागांत मुसळधार पाऊस, काही ठिकाणी होणार अतिवृष्टी!

याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आल्यावर तीन फेब्रुवारी 2006 रोजी शहर पोलीस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली.

इतर बातम्या  - मोदींचं नाव घेताच बसला शॉक, पाहा पाकिस्तानच्या 'आयटम' मंत्र्याचा व्हायरल VIDEO

या गुन्ह्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह खान्देश बिल्डरचे मक्तेदार जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा एकूण 90 जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल होऊन आणि संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनही मार्च-एप्रिल 2008 पर्यंत घरकुल गैरव्यवहारातील संशयितांना अटक झाली नव्हती.

इतर बातम्या - 11 महिन्याच्या चिमुकलीवर उपचार करण्यासाठी आईची भन्नाट आयडिया, आधी बाहुलीला बांधलं प्लास्टर!

संशयितांचे राजकीय वजन, त्यांचा दबाव, पोलीस अधिकाऱ्यांची चालढकल, तपासी अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे सहा वर्षे हा तपास रेंगाळला. जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा विषय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उचलून धरल्यानंतर या प्रकरणातील संशयितांचे अटकसत्र सुरू झाले. सुरेश जैन यांना या प्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. अधिकृतपणे साडेचार वर्षे कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी शिक्षेतला बराच काळ आजारपणाच्या नावाखाली आलेशान रुग्णालयात ऐशोआरामात काढला होता.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...