Home /News /maharashtra /

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घरीच फसवणुकीची घटना,अडीच कोटींना घातला गंडा

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घरीच फसवणुकीची घटना,अडीच कोटींना घातला गंडा

खोटी बिलं व पावती बनवून घोष याने मुक्ता बोबडे यांची फसवणूक केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

नागपूर, 09 डिसेंबर : नागपूरमध्ये  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे या बऱ्याच वृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. सायबर सुरक्षा देणाऱ्या सर्वात मोठ्या फर्मवरच सायबर हल्ला बोबडे कुटुंबीयांची शहरातील आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपत्तीवर सीझन लॉन उभारण्यात आले आहे. या लॉनची मालकी ही मुक्ता बोबडे यांच्या नावावर आले.  हा लॉन चालवण्यासाठी तापस घोष याला दिला होता. गेल्या 10 वर्षांपासून तापस घोष आणि त्यांची पत्नी हा लॉन चालवत होते. पण घोष याने लॉनच्या भाडेपोटी मिळणाऱ्या रक्कमेमध्ये बनावट पावत्या तयार करून हिशेबामध्ये हेराफेरी  केली. शेम टू शेम! IND VS AUS टी-20 सामना पाहायला आला विराटचा डुप्लिकेट, चाहतेही अवाक खोटी बिलं व पावती बनवून घोष याने मुक्ता बोबडे यांची फसवणूक केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.  हे प्रकरण संवेदनशील असल्याने फसवणूक केल्या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोबडे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी तापस घोष याला पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी सांगितले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या