कोपरगाव शहराला महापुराचा विळखा, अनेक घरांमध्ये घुसलं पाणी

कोपरगाव शहराला महापुराचा विळखा, अनेक घरांमध्ये घुसलं पाणी

कोपरगाव शहराला छावणीचे स्वरूप आले असून अनेक नागरिक शाळा महाविद्यालयात आश्रयाला आले आहेत. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास 3 लाख क्युसेक्सने पाणी नदीपात्रात आलंय.

  • Share this:

अहमदनगर 5 ऑगस्ट : गोदावरी नदीला आलेल्या महापुरानं अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव शहराला पाण्याने विळखा घातलाय. शहरात येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील अनेक उपनगरांमध्ये, दुकानात आणि घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जवळपास 3 लाख क्युसेक्सने पाणी नदीपात्रात झेपावत होते त्यामुळे गोदावरी नदी आपलं पात्र सोडून बाहेर पडली आहे.

गोदावरी नदीच्या काठी असणाऱ्या अनेक गावांमध्येही पाणी घुसले असून सर्वात जास्त फटका कोपरगाव शहराला बसलाय. धोक्याचा इशारा असल्याने प्रशासकीय यंत्रणा अगोदरच सज्ज झाली होती. त्यांनी पुराचे पाणी ज्या परीसरात जावू शकते असा सगळा परीसर अगोदरच रिकामा करण्यात आला होता.

लष्कर आणि हवाई दल 'हाय अलर्ट'वर, काश्मिरात पाकिस्तान कुरापत काढणार?

सध्या कोपरगाव शहराला छावणीचे स्वरूप आले असून अनेक नागरिक शाळा महाविद्यालयात आश्रयाला आले आहेत. सध्या नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाहही 2 लाख क्युसेक्सवर आला आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळालाय.

पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, कोकण आणि ठाण्यात  गेले काही  तुफान बरसणाऱ्या पावसाचा धोका कायम आहे. पुढचे दोन दिवस ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेने दिला आहे. गेली दोन दिवस बरसणाऱ्या पावसाने मुंबई, उपनगरं आणि ठाणे जिल्ह्याला प्रचंड मोठा फटका बसला. रविवारी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली तरी अनेक भागांमध्ये शिरलेलं पाणी अजून पूर्णपणे ओसरलेलं नाही. लोकांच्या घरांमध्ये आणि अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. रस्ते खराब झाले. या संकटातून सावरण्यासाठी सुरू असलेले मदतकार्य अजून संपलेलं नाही. असं असतानाच पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांच्या पोटात गोळा उठलाय.

कलम 370चा काँग्रेसला झटका, विरोध केल्यानं या ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झालं. त्यामुळे राज्यातला फक्त काही भाग वगळता सर्वदूर दमदार पाऊस झाला. तर काही भागात अती मुसळधार पाऊस झाला. अतिक्रमण, नैसर्गिक नदी नाले, बुजवणं, अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे मुंबई थोड्याशाही पावसाने ठप्प होते.

आत्तापर्यंत दोन वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोट्यवधींचं नुकसान होतं तर लाखो लोकांना हालअपेष्टांना सामोरे जावं लागतं. पाऊस एवढा मोठा होता की बचाव कार्यात स्थानिक मदत पथकांसोबतच NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: kopargaon
First Published: Aug 5, 2019 06:22 PM IST

ताज्या बातम्या