अखेर केंद्राच्या पथकाला मुहूर्त सापडला, 20 तारखेला पोहोचणार मराठवाड्यात!

अखेर केंद्राच्या पथकाला मुहूर्त सापडला, 20 तारखेला पोहोचणार मराठवाड्यात!

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागात धुडगूस घातला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीन दोस्त झाली होती.

  • Share this:

औरंगाबाद, 16 डिसेंबर : अचानक झालेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसामुळे विदर्भ (Vidharbha), पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अखेर महिन्याभरानंतर केंद्राच्या पथकाला जाग आली आहे. अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी पथक मराठवाड्यात पोहोचणार आहे.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील काही भागात धुडगूस घातला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीन दोस्त झाली होती. शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली होती. राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर अखेर महिन्याभरानंतर केंद्राचे पथक बांधावर पोहोचणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीमध्ये आणखी एक नवा अडथळा

येत्या 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्रीय पथक मराठवाड्यात दाखल होणार आहे.  उस्मानाबाद, बीड भागातील पाहणी करणार आहे. केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप हंगामाचे परीक्षण करणार आहे. परीक्षण केल्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करेल. त्यानंतर  केंद्राकडून मदत दिली जाईल.

नव्या नवरीसारखी सजली अन् चिमुकल्यासोबत उचललं धक्कादायक पाऊल

दरम्यान, 23 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत 10 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. परंतु,ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार होती. पण तत्पूर्वी राज्यात शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली आहे. या आचारसंहितेमुळे राज्य सरकार पहिल्या हप्त्यात चार हजार कोटी रुपये भलेही मंजूर केले असले तरी वास्तविक खात्यात देणे आचारसंहितेच्या नियमांमुळे अडचण झाले असल्याने राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार केले गेला होता. त्यानंतर  निवडणूक आयोगाने मदत निधी वाटण्यास ठाकरे सरकारला परवानगी दिली होती.

Published by: sachin Salve
First published: December 16, 2020, 9:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या