अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला देण्यात आलेलं आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही - अमित शहा

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला देण्यात आलेलं आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही - अमित शहा

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेलं आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही आणि कुणाला आरक्षण धोरण रद्दही करू देणार नाही.

  • Share this:

05 एप्रिल : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेलं आरक्षण केंद्र सरकार रद्द करणार नाही आणि कुणाला आरक्षण धोरण रद्दही करू देणार नाही, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटकमधल्या हुबळीमध्ये पार पडलेल्या सभेत अमित शाह बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं अॅट्रॉसिटी कायद्यात सुचावलेल्या बदलानंतर भारत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान 10 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दलित आणि आदिवासी संघटनांनी 'भारत बंद' पुकारला होता. 'आरक्षण धोरण बदलण्याची कोणीच हिंमत करू शकत नाही. संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलं आहे,' असं ते म्हणाले.

 

First published: April 5, 2018, 10:37 AM IST

ताज्या बातम्या