राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवाराला सभापतीपद, शिवसेनेच्या दोन गटात राडा

राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवाराला सभापतीपद, शिवसेनेच्या दोन गटात राडा

शिवसैनिकांनी पंचायत समिती दालनातच जोरदार वाद घातला. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

रत्नागिरी, 30 डिसेंबर : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकासआघाडी सरकार सत्तेत आलं आहे. परंतु, निवडणुकीपूर्वी पक्षात आयात करण्यात आलेल्या उमेदवाराला थेट सभापतीपद दिल्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे दोन गटामध्ये एकच राडा झाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड पंचायत समिती सभापती पदावरून  शिवसेनेचे दोन गटात आद मोठा वाद झाला. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मुलाला विधानसभा निवडणुकीत मदत करणाऱ्या संदेश चिले यांच्या पत्नीला सभापती पदाची लॉटरी लागली. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या प्रणाली चिले यांना उमेदवारी देण्यात  आली.

त्यामुळे शिवसैनिकांनी पंचायत समिती  दालनातच जोरदार वाद घातला. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते  एकमेकांवर धावून गेले.  प्रणाली चिले यांच्या नावाला शिवसेनेच्या एक गटाने जोरदार विरोध केला आहे.

यावेळी शिवसेना रामदास कदम यांचे बंधू  जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम हेही हजर होते. त्यांच्यासमोरच हा वाद झाला. यावेळी  शिवसेनेच्या दोन्ही गटात तूतू-मैमैं झाली. अखेर  सेनेकडून सभापती पदासाठी प्रणाली चिले तर उपसभापती पदासाठी  स्नेहल सकपाळ दोघींचे अर्ज  सादर झाले.  मंडणगड पंचायत समितीत 4 सदस्य आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्य प्रणाली चिले यांना शिवसेनेच्या सदस्यांनी सूचक अनुमोदन दिल्याने त्या सभापती झाल्या आहेत.

प्रणाली चिले या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. त्यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. राष्ट्रवादीच्या प्रणाली चिले यांनी अजूनही अधिकृत सेनेत प्रवेश केला नसल्याने कट्टर शिवसैनिक पक्षमार्फत निवडून आलेल्या स्नेहल सकपाळ यांच्यासाठी आग्रही आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, 36 मंत्र्यांनी घेतली शपथ

दरम्यान, आज राजभवनाच्या प्रांगणात महाविकासआघाडीच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रवादीचे  नेते अजित पवार यांनी राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची तर परळीचे आमदार धनंजय मुंडे, कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिन्ही पक्षांच्या एकूण 36 मंत्री शपथ घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या