34 प्रवाशांसह बस दरीत कोसळली असती, महाबळेश्वरच्या पसरणी घाटात भीषण अपघात

34 प्रवाशांसह बस दरीत कोसळली असती, महाबळेश्वरच्या पसरणी घाटात भीषण अपघात

पुण्यातील चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वरला खाजगी बसने चालले होते.

  • Share this:

वाई, 31 डिसेंबर : सर्वत्र मोठ्या जल्लोषात नववर्षांचं स्वागत होत आहे. महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar ) 34 प्रवाशांना घेऊन जात असताना पसरणी घाटात अपघात झाला. या अपघातात 5 प्रवासी जखमी झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ड्रायव्हरने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे नववर्षांच्या पूर्व संध्येला मोठा दुर्घटना टळली.

पुण्यातील चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वरला खाजगी बसने चालले होते. या बसमध्ये एकूण 34 प्रवासी होते. 31 डिसेंबरला सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवल पालखी रस्त्यावर अवघड वळणावर उतारावर अचानक बसचे ब्रेक फेल झाले.

काश्मीरच्या लहानशा गावातल्या मुस्कानला युवा संशोधक पुरस्कार, गावकरी आनंदले!

त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्यामुळे खाजगी बस क्रमांक (एम एच 14 सीडब्लू 4764) रस्त्यावरच उलटली. वळणावरील असलेल्या चरीत चाक गेल्याने बसला अपघात झाला आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी घडली असती.

Horoscope 2021 Taurus: वृषभ राशीच्या लोकांना हे वर्ष जाईल आनंदाचं

परंतु, अचानक झालेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.  घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बस उलटल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दोन तासांच्या प्रयत्नानंतर बस बाजूला हटवण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Published by: sachin Salve
First published: December 31, 2020, 11:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या