अकोल्यात चार मजली इमारत कोसळली, तिघांना बाहेर काढलं

अकोल्यात चार मजली इमारत कोसळली, तिघांना बाहेर काढलं

इमारतीच्या ढिगाराखालून 3 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

  • Share this:

कुंदन जाधव, प्रतिनिधी

अकोला,18 डिसेंबर : शहरातील  तेलीपुरा चौकात एक जुनी चार मजली रहिवासी इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाराखालून 3 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून एक जण ढिगाराखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास तेलीपुरा भागातील चार मजली जुनी इमारत कोसळली. चोपडे कुटुंबीय या इमारतीत राहत होते. ही इमारत जुनी झाल्यामुळे खचलेली होती. आज रात्री 8.30 सुमारास ही इमारत अचानक कोसळली. परिसरात एकच मोठा आवाज झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. इमारत कोसळल्यानंतर ढिगाराखाली काही लोकं अडकली. स्थानिकांनी धावाधाव करून इमारतीच्या ढिगाराखालून तिघांना बाहेर काढलं. या तिघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवलं आहे.

या ढिगाराखाली  एक जण दबल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या ढिगाराखाली आणखी किती लोक आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस प्रशासन, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान,ही जुनी इमारत असल्याने महापालिकेनं नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे.

==========================

First published: December 18, 2018, 10:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading