मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दगडाने ठेचून तरुणाचा खून, धडापासून वेगळे झाले शीर; बीडमधील खळबळजनक घटना

दगडाने ठेचून तरुणाचा खून, धडापासून वेगळे झाले शीर; बीडमधील खळबळजनक घटना

खाजगी कामानिमित्त हैदराबादहून अंबाजोगाईला आलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली

खाजगी कामानिमित्त हैदराबादहून अंबाजोगाईला आलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली

खाजगी कामानिमित्त हैदराबादहून अंबाजोगाईला आलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली

बीड, 17 मार्च : खाजगी कामानिमित्त हैदराबादहून अंबाजोगाईला आलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी दासोपंत समाधी परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रसूल सत्तार कुरेशी (वय 32 )असं मयताचं नाव आहे. ते अंबाजोगाई शहरातील  बाराभाई गल्ली याठिकाणचे रहिवाशी आहेत. चेहरा छिन्नविछिन्न झालेला रसुलचा मृतदेह येल्डा रोडवरील दासोपंत स्वामी समाधी परिसरालगत आढळून आला. मृतदेहाच्या खिशातील कागदपत्रांवरून तो रसूलच असल्याची ओळख त्याच्या कुटुंबीयांनी पटविली. मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला दगड आढळून आल्याने अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून रसूलचा खून करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे, घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दहिफळे आणि उपनिरिक्षक सोळंके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे. एकतर्फी  प्रेमातून कात्रीने केले तरुणीवर सपासप वार दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट इथं एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणावर कात्रीने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्ला करून पळ काढणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडले आणि बेदम धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास टाकळघाट इथं ही घटना घडली. या परिसरात एका फार्मसीमध्ये 20 वर्षीय तरुणी साफसफाईचे काम करते. नेहमीप्रमाणे आज सकाळी ती कामासाठी पोहोचली. काही वेळानंतर आरोपी शुभम काकडे(वय 23) तिथे पोहोचला. त्याने या तरुणीशी वाद घातला. त्यानंतर दुकानातील कात्रीने या तरुणीवर हल्ला चढवला. तिने आरडाओरडा केल्यानंतर शेजारील दुकानदार आणि फार्मसीच्या मालकाने धाव घेऊन आरोपी तरुणाच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संतापलेल्या लोकांनी या तरुणाची बेदम धुलाई केली. तर कात्रीने वार झाल्यामुळे जखमी झालेल्या तरुणीला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. तिथे तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर एका खासगी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं. जखमी झालेली तरुणी आणि आरोपी तरुण हे दोघेही एकाच वस्तीत राहतात. शुभम हा एमआयडीसीमधील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी करतो.  दोघांमध्ये या आधी प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली. परंतु, दोनच दिवसांपूर्वीच या तरुणीचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे या तरुणाने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. लोकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी शुभमची प्रकृती बिघडली असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे.
First published:

Tags: Beed, Crime

पुढील बातम्या