• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मधू इथे तर चंद्र तिथे; पुरामुळे नवरा-नवरी अडकले, लग्नाचा मुहूर्त टळला!
  • SPECIAL REPORT: मधू इथे तर चंद्र तिथे; पुरामुळे नवरा-नवरी अडकले, लग्नाचा मुहूर्त टळला!

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 09:03 AM IST | Updated On: Aug 12, 2019 10:00 AM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापूर सांगलीमध्ये आलेल्या महापूरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. यातच पुरामुळे खोळंबलेल्या एका लग्नाची अनोखी गोष्ट पहायला मिळाली. धुळ्याची नवरी आणि भुदरगड तालुक्यातल्या कोंडोशीचा नवरा यांचं 6 ऑगस्टला गोरगोटीत लग्न होतं. मात्र, 5 ऑगस्टला जो महापूर आला त्यात सगळे रस्ते बंद झाले. आणि नवरा भुदरगड तालुक्यात अडकला. तर नवरी हातकणंगले तालुक्यातल्या अंबपमध्ये अडकली. त्यामुळे लग्नाचा मुहुर्त टळून गेला. आता ही नवरी आणि व्हराडी सगळे मागल्या 5 दिवसांपासून अंबपच्या अशोक माने हॉस्पिटलमध्ये थांबले आहेत. आता हे सगळे व्हराडी पूर ओसरण्याची वाट बघत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading