Home /News /maharashtra /

जी गाडी घेऊन दिली, तिचीच चावी न दिल्यामुळे मुलाने बापाला जीवे ठार मारले!

जी गाडी घेऊन दिली, तिचीच चावी न दिल्यामुळे मुलाने बापाला जीवे ठार मारले!

एका दुचाकीसाठी एका मुलाने आपल्याच जन्मदात्या बापाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची संतापजनक घटना भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली.

    प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी भंडारा, 06 मार्च : प्रत्येक बाप हा आपल्या लेकराचा हट्ट पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करतो आणि त्याचा हट्ट पूर्ण करतोच. पण, एका दुचाकीसाठी मुलाने आपल्याच जन्मदात्या बापाला काठीने बेदम मारहाण करून जीव घेतल्याची संतापजनक घटना भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडली.  वडिलांचा खून करून मुलगा थेट पोलीस ठाण्यात पोहचला एकच खळबळ उडाली होती. ताराचंद टिचकुले वय 52 वर्ष असं मृत वडिलांचे नाव आहे. ताराचंद आणि त्यांचा मुलगा लोकेश ताराचंद टिचकुले (वय 21) यांच्यात नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत होता. गुरुवारी दुपारी लोकेश टिचकुले शेतातून घरी परत आले. येताच त्याने वडील ताराचंद यांना 'माझ्या दुचाकीची चाबी दे', असं म्हटलं.  मुलांचा अवतार पाहून वडिलांनी नकार देताच त्याने भांडण सुरू केले. आपलाच मुलगा आपल्याशी भांडत असल्यामुळे ताराचंद यांचा पार चढला आणि त्यांनी अंगणात पडलेल्या काठीने लोकेशला अंगणात मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकेशने त्यांच्या हातातून काठी घेऊन ताराचंद यांच्या डोक्यावर प्रहार केले.  क्षणात ताराचंद हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ताराचंद हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना दोन मुलं असून लोकेश हा लहान मुलगा आहे. नेहमी तो वडिलांसोबत वाद घालत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेल्या ताराचंदला पाहून प्रत्येक जण हळहळत व्यक्त  करत होता. तर हत्या केल्यानंतर आरोपी लोकेशने स्वत: लाखनी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर हजर झाला. आणि आपण वडिलांचा खून केला असल्याची कबुली दिला. पोलिसांनी तातडीने लोकेशला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. परंतु, अत्यंत किरकोळ कारणावरून मुलानेच बापाची हत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बिअरचे थेंब अंगावर उडाले, बाऊन्सरची तरुणाला मारहाण दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीत वाढदिवस साजरा करत असताना बिअरच्या बॉटल्सचे फवारे उडवत असताना काही थेंब हॉटेल्स मॅनेजमेंटच्या बाऊन्सच्या अंगावर पडल्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात एक जण किरकोळ जखमी झाला असून अंगरक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुभम बा कचरे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर पांडुरंग खोते असं मारहाण करणाऱ्या बाऊन्सरचं नाव आहे. हिंजवडीतील एफएमएल या हॉटेलमध्ये फिर्यादी हे मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये मौज मजा सुरू होती. त्याच वेळी वाढदिवस साजरा करत असताना (शाम्पेन) बिअरची बॉटल्सचे फवारे हवेत उडवण्यात आले, काही थेंब हॉटेलमधील बाऊन्सरच्या अंगावर पडले. यावरून फिर्यादी शुभम कचरे आणि अंगरक्षक पांडुरंग खोते यांच्यात वाद झाला. पांडुरंग खोते याने शुभम यांना शिवीगाळ करत प्लास्टिकच्या पाईप ने मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शुभम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  असून आरोपी बाऊन्सरला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड हे करत आहेत.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या