Home /News /maharashtra /

तब्बल 12 वर्ष बोगस डॉक्टर म्हणून थाटले दुकान, किडनी देण्यासाठी तरुणाला दीड लाखांना लुटले

तब्बल 12 वर्ष बोगस डॉक्टर म्हणून थाटले दुकान, किडनी देण्यासाठी तरुणाला दीड लाखांना लुटले

एक नव्हे, दोन वर्षे नव्हे, तर हा प्रदीप सुतार नावाचा भामटा गेल्या 12 वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले.

एक नव्हे, दोन वर्षे नव्हे, तर हा प्रदीप सुतार नावाचा भामटा गेल्या 12 वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले.

एक नव्हे, दोन वर्षे नव्हे, तर हा प्रदीप सुतार नावाचा भामटा गेल्या 12 वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले.

    उस्मानाबाद, 18 सप्टेंबर : किडनी (kidney) निकामी झालेल्या रुग्णाला किडनी देतो म्हणून एका डॉक्टराने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादेत घडली आहे. एका भामट्याने डॉक्टर (bogus doctor) असल्याचे सांगून तरुणाना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या बोगस डॉक्टराला बार्शी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप सुतार (pradeep sutar) असं या भामट्याचं नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा बावी येथील नितीन सुतार या तरुणांची गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. नात्यातील प्रदीप सुतार याने मी पेशाने डॉक्टर असून तुला किडन्या सरकारी योजनेतून मिळवून देतो, असं सांगितलं. 'पुन्हा चित्रपटांत कमबॅक कर' करिश्मा कपूरचं सौंदर्य पाहून चाहते पडले प्रेमात! त्यानंतर या भामट्याने पीडित तरुण व तरुणांच्या वडिलांकडून 1 लाख 70 हजार रुपये देखील घेतले मात्र पैसे देऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रमोद हा किडनी देत नाही हे लक्षात आलं. त्यानंतर नितीन याने दिलेले पैसे मागण्यासाठी तगादा लावला असता ते पैसे ही परत देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर हताश झालेल्या नितीनच्या वडिलांनी या प्रदीप सुतारचा शोध घेतला असता तो डॉक्टरच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एक नव्हे, दोन वर्षे नव्हे, तर हा प्रदीप सुतार नावाचा भामटा गेल्या 12 वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी प्रदीप सुतारशी संपर्क करून पैसे मागितले असता 'मी डॉक्टरच नाही मी तुला पैसेच देऊ शकत नाही तुला काय करायचे ते करून घे' असा इशारा त्यांनी नितीन च्या वडिलांना दिला असता त्यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली. सिद्धूंनी केला कॅप्टनचा पत्ता कट; अमरिंदर सिंह यांनी दिला CM पदाचा राजीनामा या प्रकरणी बोगस डॉक्टर प्रदीप सुतारवर फसवणुकीसह अनेक गंभीर कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  बार्शी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. मात्र, पेशाने शेतकरी असणाऱ्या नितीनच्या वडिलांची नितीनला वाचवण्यासाठी चांगलीच परवड होत असून त्याचे रक्त डायलिसिस करण्यासाठी सरकारी दवाखान्यात आठवडा 2 ते 3 हजार रुपये खर्च येत असून आता मुलाला वाचवावे कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. बोगस डॉक्टर प्रदीप सुतारला नुसती अटक होऊन चालणार नाही तर पोलिसांनी त्याच्याकडील असणारे पैसे परत मिळवून द्यावे अशी मागणी ते करत आहेत. दरम्यान, बोगस प्रदीप सुतार गेल्या 12 वर्षांपासून बार्शी कोल्हापूर सांगली या परिसरात डॉक्टर म्हणून व्यवसाय करत होता. या काळात त्याने अनेक जणांना फसवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या