Home /News /maharashtra /

मंदीत संधी साधून थाटला दवाखाना, गर्भपात आणि सेक्स पॉवरच्या विकत होता गोळ्या!

मंदीत संधी साधून थाटला दवाखाना, गर्भपात आणि सेक्स पॉवरच्या विकत होता गोळ्या!

त्याच्या दवाखान्यातून गर्भपात करणाऱ्या, सेक्स पॉवर वाढवणाऱ्या आणि स्टिरॉइड अशा 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    किशोर गोमासे, प्रतिनिधी वाशिम, 26 मे : कोरोनाच्या  (Corona) महामारीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहे. पण दुसरीकडे या संधीचा गैरफायदा घेऊन काही महाभाग माणुसकीला काळीमा फासत आहे. वाशिममध्ये (Washim) एका बोगस डॉक्टराचा प्रशासनाने भांडाफोड केला आहे. त्याच्या दवाखान्यातून गर्भपात करणाऱ्या, सेक्स पॉवर वाढवणाऱ्या आणि स्टिरॉइड अशा 20 ते 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं रौशन क्लिनिक या नावाने सुरू असलेल्या एस एम सिद्दीकी यांच्या बोगस दवाखान्यावर दोन दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली. यावेळी येथे 2 रुग्णांवर अवैधरित्या उपचार सुरू होते. त्या व्यक्तीकडे असणारे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी या रुग्णालयात 25 लाखाहून अधिक किंमतीचा औषध साठाही आढळून आल्याची माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली आहे. 'भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकले' राऊतांचा पलटवार डॉक्टरकडे डिग्रीबाबत विचारणा केली असता बोगस MCAM & BSAM यांचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ अलटरनेटिव्ह मेडिसीन दिनांक 30 डिसेंबर 2005 कोर्स BAMS(AM) नंबर AM 2638 असे कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र दाखविले. यानुसार रुग्णांना ऍडमिट करण्याचा ऍलोपॅथिक औषधे देण्याचा औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना त्यांनी अधिकार कक्षे बाहेर जाऊन गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले. दवाखान्यामध्ये ज्या रुग्णांचे तपासणी अहवाल आढळले त्यावरून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर सुद्धा येथे उपचार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. ही माहिती तहसीलदार धिरज मांजरे आणि पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना देण्यात आली. या क्लिनीकमध्ये वरील मजल्यावर सापडलेल्या औषधामध्ये लैंगिक क्षमता वाढविणाऱ्या UViagra व Suhagra गोळ्या, गरोदर महिलांचे ब्लिडिंग थांबवणाऱ्या गोळ्या, झोपेच्या व गुंगी आणणाऱ्या गोळ्या, स्टिरॉइड ज्यांचा कोरोना रुग्णावर सुरुवातीस जास्त प्रमाणात वापर झाल्यास म्युकर म्युकोसिसचा धोका निर्माण होऊ शकतो. 'दोन मुलींचा बाप म्हणून अस्वस्थ आहे,' शाळेत घडलेल्या घटनेमुळे अश्विन व्यथित या कारवाईमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हे डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्यानं अनेकांना आपले जीव ही गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच एक बोगस डिग्री असलेला डॉक्टर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असल्याच्या तक्रारीवरून कारंजा तालुका रुग्ण कल्याण समिती, आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारंजा शहरातील रोशन क्लिनिकवर कारवाई केली आहे. या क्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवलेला औषधासाठा असल्यानं अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करत आहेत. कारंजा तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येच्या अनुषंगाने बोगस डॉक्टर कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोरोना तपासणीबाबत सूचना न देता त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारी प्रशासन व तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या