मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरजीलच्या विधानाचा भाजपकडून विपर्यास, एल्गार परिषद ठामपणे पाठीशी

शरजीलच्या विधानाचा भाजपकडून विपर्यास, एल्गार परिषद ठामपणे पाठीशी

' फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतका विकृत, हिंसक आणि द्वेषपूर्ण लक्ष्य केले जात आहे'

' फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतका विकृत, हिंसक आणि द्वेषपूर्ण लक्ष्य केले जात आहे'

' फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतका विकृत, हिंसक आणि द्वेषपूर्ण लक्ष्य केले जात आहे'

पुणे, 07 फेब्रुवारी : पुण्यात (Pune) झालेल्या एल्गार परिषदेमधील (sharjeel usmani) शरजील उस्मानीच्या भाषणावर विधानावरून वाद पेटला आहे. शर्जीलविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहे. पण, शर्जीलच्या विधानाचा भाजप आणि संघाने विपर्यास केला आहे, असं म्हणत एल्गार परिषदेने (elgar parishad) शरजीलच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच शरजीलचं संपूर्ण भाषणही प्रसिद्ध केले आहे.

एल्गार परिषदेनं एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरजीलच्या वक्तव्याचा  संघ आणि भाजपनं विपर्यास केला आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले देशद्रोहाचे आरोप चुकीचे आहे. एल्गार परिषदेचे आयोजक म्हणून आम्ही ठामपणे पाठीशी उभे आहोत असं स्पष्टीकर  एल्गार परिषदेनं दिले आहे.

" isDesktop="true" id="519460" >

शजील उस्मानी एक 23 वर्षाचा मुस्लिम तरुण. मुस्लिम यासाठी नमूद करावं लागतंय कारण फक्त आणि फक्त त्याच्या धर्मामुळे आज त्याला इतका विकृत, हिंसक आणि द्वेषपूर्ण लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही एल्गार परिषदेच्या आयोजकांनी केला आहे.

शरजील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्याथी आणिण स्वातंत्र्य शोध-अभ्यासक आहे.  शरजील उस्मानी 'फ्रॅटर्निटी मुव्हमेंट'चा राष्ट्रीय सचिव आहे.  एनआरसी, सीएए, एनपीआर विरोधातील आंदोलनात शरजील उस्मानीचा सक्रीय सहभागी होता. उत्तरपदेशचा योगी सरकारने ज्या अनेक तरुणांवर हिंसाचाराचे खोटे आरोप लावून त्यांना अटक केली. त्यात शरजील उस्मानी देखील होता, असा खुलासाही एल्गार परिषदेनं केला.

लखनऊ आणि पुण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी यांच्या विरोधात लखनऊ येथील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात सुद्धा शरजील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published: