• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • नवी मुंबईचा श्वास गुदमरतोय, धक्कादायक चित्र आले समोर!

नवी मुंबईचा श्वास गुदमरतोय, धक्कादायक चित्र आले समोर!

कृत्रिम फुफ्फुसांची जोडी जानेवारी 2020 मध्ये मुंबईच्या वांद्रे परिसरात उभारण्यात आली होती. ती फुफ्फुसंही केवळ 14 दिवसांत काळी पडली.

  • Share this:
मुंबई, 27 जानेवारी : 15 जानेवारी रोजी खारघरच्या (Kharghar) अत्यंत व्यस्त अशा चौकात उभारलेल्या पाढंऱ्या शुभ्र रंगाच्या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग अवघ्या 10 दिवसांत काळा पडला आहे. खारघर-तळोजा-पनवेल परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वायू प्रदुषणाबाबत (air pollution) सामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी वातावरण फाउंडेशनने  (Waatavaran Foundation)आखलेल्या एका आगळ्यावेगळ्या मोहिमेचा महत्वाचा भाग म्हणजे खारघरच्या चौकातली ही कृत्रिम फुफ्फुसं. 'द बिलबोर्ड दॅट ब्रेथ्स'  (THE BILLBOARD THAT BREATHES) असे शीर्षक देऊन ही कृत्रिम फुफ्फुसं खारघर येथील सेक्टर 7 मधील बॅंक ऑफ इंडिया चौकात उभारण्यात आली. 'हवेचे अत्युच्च प्रदुषण झाल्याचं लक्षण दाखवणारा कोणतातरी एक घटक श्वासावाटे आपल्याही शरीरात जातो आहे, हेच या फुफ्फुसांच्या बदललेल्या रंगातून आपण ओळखू शकतो' असं  वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले. वुहानच्या पहिल्या corona ग्रस्त कुटुंबाला काहीतरी सांगायचंय! WHO घेणार शोध 'आता गेल्या काही दिवसांत लॉकडाऊन उघडल्यानंतर रस्त्यावरची रहदारी तसंच, बांधकामं अशा गोष्टी पुन्हा सुरू झाल्याने वायू प्रदुषणाची पातळीही वाढत चालली आहे. स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग काळा व्हायला सुरूवात झाली होती आणि सातच दिवसांत हा रंग करडा झाला. सोमवारी, 25 जानेवारीला मात्र या फुफ्फुसांचा रंग पूर्णतः काळा झाल्याचे आमच्या निदर्शनास आले, केसभट सांगतात. खारघरमधले स्थानिक रहिवासी प्रदुषित हवा श्वासावाटे आत घेत आहेत, हे पटवून देण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग असल्याचेही केसभट म्हणाले, स्थानिक रहिवासी या बिलबोर्डला भेट देतात. इतकेच नव्हे तर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमाल यांच्यासह सहा ते सात स्थानिक राजकीय नेत्यांनीही या ठिकाणाला भेट दिली आणि वाढत्या प्रदुषणाबद्दलची समस्या गांभीर्याने घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले. IPL 2021: ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव, वाचा कोणत्या टीमकडं किती आहेत पैसे अशाच प्रकारची कृत्रिम फुफ्फुसांची जोडी जानेवारी 2020 मध्ये मुंबईच्या वांद्रे परिसरात उभारण्यात आली होती. ती फुफ्फुसंही केवळ 14 दिवसांत काळी पडली. तर, दिल्लीत नोव्हेंबर 2018 मध्ये तयार केलेली कृत्रिम फुफ्फुसे अवघ्या 6 दिवसांत काळी झाली. या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा विचार धोक्याची घंटा म्हणूनच केला जावा आणि या भागातल्या हवेचा पोत सुधारण्यासाठी त्वरित काही महत्वपूर्ण हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा खारघरवासी आणि काही तज्ञ मंडळी महाराष्ट्र सरकारकडून करत आहेत. वातावरण फाउंडेशनतर्फे 13 नोव्हेंबर 2020 ते 13 डिसेंबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत हवेच्या दर्जाची तपासणी करण्यात आली. यानुसार असे निदर्शनास आले की, खारघर-तळोजा-पनवेल परिसरातील लोक दिवसांतून जवळपास 17 तास प्रदुषित हवेत श्वास घेतात. या अभ्यासांती असे स्पष्ट झाले की, या भागातल्या हवेत सकाळी 6 ते 8 या वेळात पर्टिक्युलर मॅटर पोल्युटंट म्हणजेच पीएम 2.5 हा घटक सर्वाधित असतो. Ration Card मध्ये अशाप्रकारे अपडेट करा मोबाईल नंबर आणि पत्ता; घरबसल्या होईल काम आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की 'खारघर-तळोजा-पनवेल परिसरातल्या वायू प्रदुषणाच्या या गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी सर्वच सामान्य लोकांनी एकत्र येऊन एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे'. 'स्थानिक रहिवासी रोज श्वासावाटे प्रदुषित, विषारी हवा शरिरात घेतात, याबद्दल चिंता व्यक्त करताना महापौर डॉ. कविता चौतमाल यांनीही हवेचा पोत तपासण्यासाठी आणि यामागचे कारण समजून घेऊन त्यावर उपाययोजना राबवण्यासाठी एका विशेष समितीची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.
Published by:sachin Salve
First published: