धर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर !

धर्मद्रोही ठरवून 'तीन' जण होते विरेंद्र तावडेच्या निशाण्यावर !

या तिघांचे फोटो सीबीआयने विरेंद्र तावडेच्या काॅम्प्युटर मधून जप्त केले होते. हे सर्व फोटो सीबीआयने विरेंद्र तावडेच्या आरोप पत्रात देखील समाविष्ट केले होते.

  • Share this:

अजित मांढरे,ठाणे 21 आॅगस्ट :  गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अमोल काळेच्या मुसक्या आवळल्या तर नालासोपारा स्फोटकं प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने शरद कळसकरला बेड्या ठोकल्या. पण यांच्या तपासातून सचिन अंदुरेचे नाव समोर आले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. डाॅक्टर नरेंद्र दाभोळकरवर सचिन अंदुरेनं गोळ्या झाडल्या हे ही तपासात समोर आलं. पण ज्या विरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली त्या विरेंद्र तावडतेच्या टार्गेटवर ३ आणखी जण होते. कोण होते ते तिघं? असं काय केलं होतं त्यांनी?

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या विरेंद्र तावडेच्या सांगण्यावरून करण्यात आलीये हे सीबीआयनं सचिन अंदुरेच्या सीबीआय कोठडी अर्जात स्पष्ट केलं होतं. याच विरेंद्र तावडेला सीबीआयने ११ जून २०१६ ला अटक केली होती. विरेंद्र तावडेच्या टार्गेटवर आणखी दोन लोकं होती. जर विरेंद्र तावडेला अटक झाली नसती तर आणखी २ जणांची हत्या करण्यात झाली असती असा धक्कादायक खुलासा विरेंद्र तावडेच्या चौकशीतून झालाय.

विरेंद्र तावडेच्या काॅम्प्युटरमध्ये सीबीआयला एक फोल्डर सापडला होता ज्यात या तीन अशा व्यक्तींचे फोटो होते ज्यांना “धर्मद्रोही” म्हणण्यात आलं होतं. “धर्मद्रोही” नावाचा एक फोल्डर विरेंद्र तावडेने बनवला होता. ज्यात एक पोलीस अधिकारी आणि दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे फोटो होते. जे होते विरेंद्र तावडेचे पुढचे टार्गेट..यांनाही गोळ्या घातल्या जाणार होत्या का?

पहिली व्यक्ती आहे - श्रीमंत कोकाटे, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांशी संबंधीत श्रीमंत कोकाटे यांनी विरेंद्र तावडेशी संबंधीत संस्थांना तसच व्यक्तींबाबत काही असं बोललेत जे विरेंद्र तावडे आणि त्यांच्याशी संबंधीत व्यक्तींना खटकलं म्हणून श्रीमंत कोकाटे यांना विरेंद्र तावडेने टार्गेट केलंय असा सीबीआय सूत्रांनी माहिती दिलीये.

दुसरी व्यक्ती - गौराप्रसाद हिरेमठ - तत्कालीन पोलीस अधिकार, शिळ डायघर

रात्री पेट्रोलिंग दरम्यान एक महाराज भर रस्त्यात उभा होते  ते पोलिसांची गाडी जाऊन देत नव्हते. त्याला गौरीप्रसाद हिरेमठ यांनी जाब विचारला असता ते उलट सुलट उत्तर देऊ लागले त्यांवर गौरीप्रसाद हिरेमठ यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली आणि नंतर त्यांनी त्या महाराजांवर कारवाई केली असता अनेक संस्थांच्या लोक पोलीस स्टेशनला जमा होऊन गौरीप्रसाद हिरेमठ यांची तक्रारीवर वरीष्ठांना केली होती आणि त्यांना माफी मागण्यास सांगितली होती.

तिसरी व्यक्ती विजय सोनवणे - यांचे नेमकं विरेंद्र तावडे यांच्याशी काय वैर होते याची माहिती मिळाली नाहीये.

या तिघांचे फोटो सीबीआयने विरेंद्र तावडेच्या काॅम्प्युटर मधून जप्त केले होते. हे सर्व फोटो सीबीआयने विरेंद्र तावडेच्या आरोप पत्रात देखील समाविष्ट केले होते. त्यामुळे हे तिघं विरेंद्र तावडेचे पुढील टार्गेट होते का? याबाबत सीबीआय आता नव्याने चौकशी करणार आहेत. हे सर्व पुन्हा समोर येण्याचे कारण म्हणजे कर्नाटक पोलिसांनी अटक केलेल्या अमोल काळेच्या लिस्टमध्ये जी ३६ जणांची नावे समोर आली होती. या तिघांनाही याबाबत तपास यंत्रणांनी कल्पना दिली होती असंही सीबीआय सुत्रांनी सांगितलंय. पण विरेंद्र तावडे आणि त्यानंतर अमोल काळे च्या अटकेमुळे हा कट अंमलात येण्या आधीच बारगळला काय याची देखील चौकशी केली जाणार आहे.

VIDEO : पाण्याची टाकी पाडणे बेतले जीवावर,'पोकलेन'वर कोसळली टाकी

First published: August 21, 2018, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading