मुंबईतील मोठी बातमी; या दुकानांना लॉकडाऊनमधून मिळणार सूट

मुंबईतील मोठी बातमी; या दुकानांना लॉकडाऊनमधून मिळणार सूट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गरज लक्षात घेता ही दुकाने खुली राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या मुंबईसह इतर देशभरात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. आता हळूहळू इतरही दुकांनाना खुले राहण्याची परवानगी दिली जात आहे.

सध्या जीवनावश्यक आणि आयुष्य वाचवणाऱ्या मशीन, आयटी संदर्भातील अनेक मशीन यांना दुरुस्तीची गरज आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ही दुकाने बंद असल्याने त्यांना फटका सहन करावा लागत आहे. म्हणून मुंबईत हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिकची दुकाने आजपासून खुली राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका रस्त्यावर अवघे एक दुकान खुले राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तेदेखी एकटं दुकान असल्यास ती खुली ठेवता येणार आहे. मॉलमधील दुकानांना उघडण्यास बंदी आहे.  lockdown च्या काळात hardware आणि electronicच्या बंद दुकानाचा फटका बसत आहे. मात्र अनेकदा महत्त्वाच्या कामांसाठी याची गरज निर्माण होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे राज्यात पोलिसांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. राज्यात गेल्या  24 तासांत 75 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. आता कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 531 झाली आहे. तर आतापर्यंत 5 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत 3, पुण्यात 1 आणि सोलापुरात एकचा मृत्यू झाला आहे.

संबंधित -धक्कादायक! आंध्रप्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही वायू गळती, 7 मजूर रुग्णालयात दाखल

मुलांनी डोळ्यांदेखल पाहिली आईची आत्महत्या, उपनिरीक्षकाच्या पत्नीने संपवलं आयुष्य

 

First published: May 7, 2020, 7:12 PM IST

ताज्या बातम्या